शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘टीप’ प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीपींकडे

By admin | Updated: November 28, 2015 01:07 IST

ट्रक तोडण्यापूर्वी खात्यातीलच काहींनी दगाफटका करून गुन्हेगारांना ‘टीप’ देण्याचे प्रकरण पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने घेतले आहे.

मोठ्या फेरबदलाचे संकेत : बड्यांवर कुऱ्हाड?अमरावती : ट्रक तोडण्यापूर्वी खात्यातीलच काहींनी दगाफटका करून गुन्हेगारांना ‘टीप’ देण्याचे प्रकरण पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने घेतले आहे. या क्लिष्ट प्रकरणाच्या चौकशीचे सूत्रे आयुक्तांनी हातात घेतली घेतली आहेत. येत्या ४/५ दिवसांमध्ये वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे या प्रकरणातील दोषींवर मोठी कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पोलीस आयुक्त व्हटकर यांनी दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्तांकडे असली तरी प्रकरणाचे गांभीर्य, बड्यांचा सहभाग यामुळे समांतर पातळीवर सुरु असलेली चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे आज शुक्रवारी आयुक्तांनी सांगितले. साधारणत: १५ दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातून चोरलेला ट्रक तोडण्यासाठी अमरावती येत असल्याची माहिती मंगरुळपीर पोलिसांनी शहरत गुन्हे शाखेला दिली होती. कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी एपीआयच्या नेतृत्वातील पथकाला नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाठविले.गुन्हे शाखा, ठाण्यांमध्ये असमन्वय अमरावती : हे पथक ट्रकची शोधाशोध करत असताना गुन्हे शाखेच्या अन्य एक पथकाला ती माहिती मिळाली व त्यातील चौघांनी मोठा आर्थिक उलाढाल करत तो ट्रक सहीसलामत परतवाड्याकडे पाठविल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत गुन्हे शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसह मन्नान या वक्तीचेही बयाण नोंदविण्यात आले आहे. कारवाईदरम्यान गुन्हे शाखा आणि नागपुरी गेट पोलीस ठाण्यामध्ये मोठे फेरबदल होण्याचे सकेत आयुक्तांनी दिले आहेत. देशी कट्टा प्रकरणात गुन्हे शाखा व नागपुरी गेट पोलीस परस्पर विरोधी वक्तव्य करीत आहेत. जावेद आमचा पंटर असल्याचा दावा एकीकडे गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी केला आहे. तर दुसरीकडे जावेद फरार असल्याची माहिती नागपुरी गेटचे ठाणेदार दत्ता गावंडे यांनी दिली आहे. जावेद जर पंटर असेल तर तो फरार का? याचे उत्तर मात्र गुन्हे शाखेकडे नाही. या प्रकरणाने गुन्हे शाखेमधील अधिकाऱ्यांच्या श्रेयाच्या लढाईसोबतच ठाणेप्रमुखांमधील असमन्वय सुद्धा उघड झाला आहे. (प्रतिनिधी)