शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

सीपी करणार ठाणेदाराची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:16 AM

जादूटोणाविरोधी कायद्याचे भय नसणाऱ्या पवन महाराजला अभय देऊन तपासात निष्काळजीपणा करणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांची चौकशी होणार आहे.

ठळक मुद्देदखल : ‘त्या’ महिला भक्तालाही करणार आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जादूटोणाविरोधी कायद्याचे भय नसणाऱ्या पवन महाराजला अभय देऊन तपासात निष्काळजीपणा करणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांची चौकशी होणार आहे. 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी ठाणेदार मनीष ठाकरेंच्या 'निग्लिजन्सी'ची तपासणी केली जाईल, अशी माहिती दिली.पवन महाराजने अनेक नागरिकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून फसवणूक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदविला जाणार आहे. भोंदूबाबाच्या घरातून पिशवी भरून साहित्य नेणाºया तरुण परित्यक्तेलाही गाडगेनगर पोलीस आरोपी करणार आहेत. तसे निर्देश पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी ठाणेदार मनीष ठाकरेंना दिले.नागरिक व अंनिसच्या तीन तक्रारींनंतर गाडगेनगर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणीला सुरुवात केली. तत्पूर्वी पोलिसांनी अंधश्रद्धा पसरविणाऱ्या  भोंदूबाबाला अटक का केली नाही, त्याच्या घराच्या झडती अर्धवट का केली, असे आदी प्रश्न गाडगेनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत.ठाणेदार ठाकरे दोन दिवसांच्या रजेवरपवन महाराजच्या भोंदूगिरीच्या प्रकरणात तपास अधिकारी तथा ठाणेदार मनीष ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका आहे. पवन महाराज पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ठाणेदार मनीष ठाकरे वैयक्तिक कामानिमित्त दोन दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे आता पुढील दोन दिवस तरी पवन महाराजच्या प्रकरणातील तपासकार्य थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचा चार्ज पोलीस निरीक्षक अनिल कुरुळकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.