शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यात हेल्पलाईननंतर आता कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’ हा नवा उपक्रम राबविला जात आहे. कोविड १९ हॉस्पीटलमधून संक्रमित रूग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर त्यांच्याशी डॉक्टरांच्या अधिनस्थ परिचारिका, आरोग्य कर्मचारी सकाळ आणि सायंकाळी टेलिफोनद्वारे संवाद साधून रूग्णाचे आरोग्य, त्यांच्या कुटुंबीयांची माहिती जाणून घेतील.

ठळक मुद्देइर्विनमध्ये प्रारंभ : ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ रुग्णांशी संवाद, डॉक्टरांच्या अधिनस्थ चमू तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संक्रमितांची वाढती संख्या निश्चितच चिंताजनक आहे. मात्र,‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ डिस्चार्ज झालेल्या रुग्णांशी संवाद साधणे आणि कोरोना नियंत्रणासाठी आता ‘कोविड हेल्थलाईन’ गठित करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारपासून या मोहिमेस प्रारंभ झाला.जिल्ह्यात हेल्पलाईननंतर आता कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’ हा नवा उपक्रम राबविला जात आहे. कोविड १९ हॉस्पीटलमधून संक्रमित रूग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर त्यांच्याशी डॉक्टरांच्या अधिनस्थ परिचारिका, आरोग्य कर्मचारी सकाळ आणि सायंकाळी टेलिफोनद्वारे संवाद साधून रूग्णाचे आरोग्य, त्यांच्या कुटुंबीयांची माहिती जाणून घेतील. त्यानुसार घरी बरे होऊन गेलेल्या होम क्वारंटाईन असलेल्या ४५ रुग्णांसोबत इर्विनमधील कोविड हेल्थलाईन चमुने गुरूवारी संवाद साधल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ रूग्णांना मार्गदर्शन करणे, आरोग्याची काळजी घेणे आणि आहारविषयी संवादातून काही टिप्स दिला जात आहे. शुक्रवारी होम क्वारंटाईन ५० रुग्णासोबत संवाद साधण्यात आला. निगेटिव्ह झालेल्या रूग्णासोबत सलग चार ते पाच दिवस संपर्क साधून संवाद साधण्याचा हा उपक्रम आहे. संवादातून रुग्णांचे मनोबल उंचावले आणि कुटुंबीयांची माहिती मिळविणे हा उद्देश आहे. जेणेकरून कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले.कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष नजरकोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन वेळीच उपचार करणे आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संसर्ग पसरू नये, यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. मेळघाट, अचलपूर व चांदूर बाजार येथील कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांना चांदूर बाजार येथे आयसोलेटेड करण्यात येणार आहे. तर, मोर्शी, तिवसा येथील लक्षणे आढळत असलेल्या रुग्णांना मोझरी येथील आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत असणार आहे. एकूणच कोरोना लक्षणांच्या रुग्णावर जिल्हा प्रशासनाची विशेष नजर असणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या