शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटर कुलूपबंद, चौकीदारांचे राज्य, धुळीसह कचऱ्याचेही साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:01 IST

या कोविड केअर सेंटर सोबतच अचलपूरमध्ये एक शासकीय डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि तीन खासगी रुग्णालय कोरोना काळात अस्तित्वात होते. या सोबतीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालय, पीडीएमसीतील कोविड रुग्णालयासह अमरावती शहरात सात खासगी कोविड रुग्णालये कोरोनाकाळात कार्यरत होते. सध्या रुग्ण नसल्यामुळे शासकीय रुग्णालय वगळता अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालये बंद असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कोरोना रुग्ण नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर कुलूपबंद आहेत. सेंटरवर चौकीदारांचे राज्य आहे. सर्वत्र धुळीसह कचऱ्याचे साम्राज्य असून कित्येक दिवसांपासून त्यात झाडूही मारला गेलेला नाही. यातील साहित्य गोळा करून ठेवण्यात आले आहे. गाद्या उभ्या करण्यात आल्या असून, पलंग जमा करण्यात आले आहेत. तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविण्यात आले आहे. काहींना कामावरून कमी करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर आणि अचलपूरमध्ये दोन कोविड सेंटर विचारात घेता, एकूण १६ कोविड  सेंटर कोरोना काळात सुरू करण्यात आले होते. हे १६ केअर सेंटर आज बंद आहेत.        या कोविड केअर सेंटर सोबतच अचलपूरमध्ये एक शासकीय डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि तीन खासगी रुग्णालय कोरोना काळात अस्तित्वात होते. या सोबतीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालय, पीडीएमसीतील कोविड रुग्णालयासह अमरावती शहरात सात खासगी कोविड रुग्णालये कोरोनाकाळात कार्यरत होते. सध्या रुग्ण नसल्यामुळे शासकीय रुग्णालय वगळता अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालये बंद असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. रुग्णालय बंद करीत असल्याचे पत्रही संबंधितांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. परतवाडा शहरातील तीनही खासगी कोविड रुग्णालयांनी आपले नाम फलक काढून घेतले आहेत. ही कोविड रुग्णालये त्यांनी बंद केली असून, तेथील कर्मचारी वर्गही कमी केला आहे. केवळ चौकीदार तेवढा दुहेरी भूमिकेत तेथे वावरत आहे. शासकीय डेडिकेटेड कोविड रुग्णालयांतर्गत परतवाड्यातील ट्रामा केअर युनिटला आणि डेडिकेटेड कोविड रुग्णालयाला कुलूप लावण्यात आले आहे. आठ ते दहा दिवसांपासून या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण दाखल नाही. त्यामुळे तेथील कर्मचारीवर्ग अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आला आहे. या रुग्णालयातील कार्यालयाचे गेट तेवढे उघडे आहे. एक नर्स आणि एक चौकीदार तेथे बघायला मिळतो. तेथील डॉक्टर फोन कॉलवर ठेवण्यात आले आहेत.

बंद सेंटरचा वाली सुरक्षा चौकीदारबंद असलेले कोवीड केअर सेंटर चौकीदाराच्या भरोशावर सोडण्यात आले आहे. या बंद सेंटरचा वाली चौकीदार असला तरी बरेचदा तोही या ठिकाणी आपल्या कामावर दिसून येत नाही. यात काही सेंटर वरून साहित्यही चोरीला गेले आहे.

कोठे पडला कचरा तर कोठे मोकाट जनावरेपरतवाड्यातील डेडिकेटेड कोवीड रुग्णालयाच्या मागील बाजूस, ट्रामा केअर युनिटच्या आणि बच्चू कडूंच्या आयसोलेशन सेंटरवर दर्शनी भागात कचरा आणि  धूळ बघायला मिळाली. मोकाट जनावरांचा येथे मुक्तसंचार आहे.

आयसोलेशन परिसरात म्हशींचा वावर वाढलाडेडिकेटेड कोविड रुग्णालय अचलपूर आणि ट्रामा केअर युनिट परिसरात वराहाचा संचार बघायला मिळाला. श्वानांच्याही येरझारा चालूच होत्या. काही सरपटणारे प्राणी ही बघायला मिळालेत. याबाबत उपस्थिती असलेल्याला विचारले असता, रुग्ण नसल्यामुळे त्यांना खायला मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील वराहांची संख्या कमी झाल्याचे त्याने सांगितले. अचलपूर नगरपालिकेच्या कल्याण मंडपम येथील बच्चू कडूंच्या आयसोलेशन सेंटरपासून काही अंतरावर त्याच परिसरात पाळीव म्हशीचे शेन बघायला मिळाले. त्या परिसरात म्हशींचा वावर असल्याचे दिसून आले

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या