शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोव्हॅक्सिन निरंक, कोविशिल्ड लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत चार टप्प्यांत लसीकरण करण्यात येत आहे. या कालावधीत आतापर्यंत २,०३,७१५ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. मात्र, एका आठवड्यांपासून लसीकरणाची वाट लागली आहे. कोविशिल्डचा साठा संपल्याने चार दिवसांपासून लसीकरण बंद होते. साडेचार लाख डोजची मागणी असताना प्रत्यक्षात २० हजार लसी मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देलसीकरण उत्सवाची दैना, जिल्ह्यातील ७५ केंद्रांना लागले टाळे, रेमडिसिव्हिर गायब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले असताना जिल्ह्यात मात्र केंद्रे मात्र लसींबाबत  कंगाल झाली आहेत. कोविशिल्डचा साठा जेमतेमच आहे, तर कोव्हॅक्सिन चार दिवसांपासून निरंक आहे. जिल्ह्यातील १२५ पैकी ७५ केंद्रांना टाळे लागले आहे. रेमडिसिव्हिर गायब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आयुधांचीच वाट लागली असल्याने कसा रोखणार कोरोना, असा नागरिकांचा सवाल आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत चार टप्प्यांत लसीकरण करण्यात येत आहे. या कालावधीत आतापर्यंत २,०३,७१५ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. मात्र, एका आठवड्यांपासून लसीकरणाची वाट लागली आहे. कोविशिल्डचा साठा संपल्याने चार दिवसांपासून लसीकरण बंद होते. साडेचार लाख डोजची मागणी असताना प्रत्यक्षात २० हजार लसी मिळाल्या आहेत.  याशिवाय कोव्हॅक्सिनचा साठादेखील तीन दिवसांपासून संपलेला आहे. त्यापाठोपाठ कोविशिल्डही आता दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे सध्याच १२५ पैकी ७५ केंद्राला टाळे लागले आहे. दोन दिवसांत डोसची उपलब्धता न झाल्यास जिल्ह्यातील जवळजवळ सर्व केंद्र बंद राहणार असल्याची स्थिती जिल्ह्यावर ओढवली आहे. लस घेऊन कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित करण्यास उत्सुक असलेल्या वयोवृद्धांचा यामुळे हिरमोड झाला आहे. तेच कोरोनाला सर्वाधिक बळी प़डत आहेत. 

असे झाले लसीकरणआरोग्य विभागाच्या माहितीनुसार हेल्थ केअर वर्कर २७,७४१, फ्रंट लाईन वर्कर २४,१२१, याशिवाय ४५ वर्षांवरील कॉमार्बिडिटी ५१,०८८ व्यक्ती तसेच ६० वर्षांवरील १,००,७८५ ज्येष्ठ नागरिक यांचे बुधवारपर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने ही केंद्रे दोन दिवसांपासून बंद असल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस