शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या स्थगितीने रेतीघाट लिलावास ‘ब्रेक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 21:17 IST

पर्यावरण मानकांचे पालन हवे : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

अमरावती : पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) व पर्यावरणीय व्यवस्थापन योजना (ईएमपी) यांच्या शिवाय वाळू लिलावाची सुरू असलेली प्रक्रिया राबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. याविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अवर सचिवांनी बुधवारी विभागीय आयुक्त व  जिल्हाधिका-यांना दिल्या. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील रेतीघाटांच्या ई-लिलावाच्या दुसºया टप्प्यातील प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. 

रेतीघाटांची ई-लिलाव प्रक्रिया प्रचलित १२ मार्च २०१३ च्या परिपत्रकान्वये सुरू करण्यात आली. जिल्ह्यात यंदा १०५ रेतीघाटांचा लिलाव होणार आहे. यामध्ये ४९ रेतीघाटांची ई-लिलावाची प्रक्रिया न्यायालयाच्या स्थगनादेशापूर्वी झालीत. यामधून महसूल विभागाला ८ कोटी ६१ लाख रुपये मिळाले. सध्या ५६ रेतीघाट ई-लिलावाच्या प्रक्रियेत आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक यांनी ‘लोकमत’सी बोलताना सांगितले.

 जिल्ह्यात ज्या रेतीघाटांचा लिलाव झाला आहे, त्यामध्ये  पर्यावरण आघात मूल्यांकन (एन्व्हायर्न्मेंट इम्पॅक्ट असेसमेंट) ची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, पर्यावरण व्यवस्थापन योजना (एन्व्हायर्न्मेंट मॅनेजमेंट प्लॅन) ही प्रक्रिया आता राबविण्यात येणार आहे. यामध्ये गौण खनिजाचे उत्खनन करीत असताना आगामी पाच वर्षांसाठी अ‍ॅक्शन प्लॉन काय आहे, याचा अहवाल  द्यावा लागणार आहे. त्यानंतरच न्यायालयाच्या पुढील आदेशाने रेतीघाटांच्या ई-लिलावाची प्रक्रिया होणार आहे. 

दरम्यान, शासनाने  ३ जानेवारीला रेती निर्गतीसंदर्भात सुधारित धोरण जाहीर केले. याचाही अवलंब आता नव्याने रेतीघाटांच्या लिलावप्रक्रियेत करावा लागणार आहे.

रेतीचे सुधारित निर्गती धोरण* पर्यावरणाचा संतुलन राखत समतोल व स्थायी विकास साधणे. प्रक्रियेत अधिकाधिक लोकांचा सहभाग घेणे.* रेती उत्खननाचा पारंपरिक व्यवसाय करणा-यांच्या हिताचे रक्षण करणे व लिलावप्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे.* अवैध उत्खनन व वाहतुकीच्या घटनांना प्रभावीपणे आळा घालून राज्याच्या महसूलात वाढ करणे.

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दुसºया लॉटमधील रेतीघाटांच्या ई-लिलावाच्या  प्रक्रियेला  स्थगिती देण्यात आली. ‘इआयए’ची प्रक्रिया यापूर्वीच करण्यात आली; आता ‘ईएमपी’चा अहवाल शासनाला देणार आहोत. - शिरीष नाईक, जिल्हा खनिकर्म अधिकारी