शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

महिलेला संरक्षणासह निवासासाठी न्यायालयाने तासाभरात दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 18:13 IST

मद्यपी पतीच्या मारहाणीनंतर घरातून हाकलून लावलेल्या पत्नीला न्यायालयात खटला दाखल होण्याच्या तासभरातच सरंक्षणासह निवास मिळून देण्यात आला.

अमरावती - मद्यपी पतीच्या मारहाणीनंतर घरातून हाकलून लावलेल्या पत्नीला न्यायालयात खटला दाखल होण्याच्या तासभरातच सरंक्षणासह निवास मिळून देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशावरून सरंक्षण अधिकाºयांनी शुक्रवारी ही कारवाई केली. धामणगाव रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असा अनुभवास आला. धामणगाव रेल्वे येथील रहिवासी महिला सारिका (३०) यांचा विवाह १३ आॅगस्ट २००५ रोजी गंगाधर मुलवंडे यांच्याशी झाला. पानठेला चालविणारे गंगाधरने लग्नानंतर दिडेक वर्षे पत्नीसोबत चांगला संसार केला. मात्र, त्यानंतर त्याला मद्याचे व्यसन जडले, तो पत्नीचा कौटुंबिक छळ करू लागला. पतीचा त्रास सहन करीत संसाराचा गाडा चालविणाºया सारिकाला दोन मुली आहेत. मद्यधुंद अवस्थेत गंगाधर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. ती कसेबसे दिवस काढत होती. मात्र, ३० आॅगस्ट २०१८ रोजी रात्री २ वाजता गंगाधरने पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिने कशीबशी रात्र काढली, मात्र, सकाळीच बहीण प्रियंकाचे घर गाठून कौटुंबिक छळ सहन न झालेल्या सारिकाने धामणगावातील सरंक्षण अधिकारी कार्यालय गाठले.सरंक्षण अधिका-यांनी त्यांची तक्रार तत्काळ नोंदवून दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाठविली. सारिकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वैद्यकीय अधिकारी आशिष सालनकर यांनी वैद्यकीय अहवाल मिळवून सरंक्षण अधिकारी कुलदीप गावंडे यांनी प्रकरण न्यायालयात दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.ए.नहर यांनी प्रकरणाची तत्क्षण दखल घेऊन सरंक्षण (कलम १८) व निवासाचा आदेश (कलम १९ अन्वये) पारित केले. याची अमंलबजावणी करण्यासाठी सरंक्षण अधिकारी कुलदीप गावंडे, दत्तापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, पोलीस कर्मचारी मोनाली बोडके व मंगेश लकडे यांनी पीडिताला घरी प्रवेश मिळून दिला. याशिवाय पीडिताचा कौटुंबिक छळ करू नये आणि घराबाहेर हाकलू नये, असे पतीला बजावण्यात आले. विशेष म्हणजे न्यायालयात प्रकरण दाखल झाल्याच्या तासाभरात आदेशाची अंमलबजावणी करीत पीडित महिलेला न्याय मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. 

कौटुंबिक हिंसाचार ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. पीडितांनी कुठल्याची प्रकारचा कौटुंबिक हिंसाचर सहन न करता, सरंक्षण अधिका-यांकडे दाद मागावी.- कुलदीप गावंडे, सरंक्षण अधिकारी, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या