शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पतीने घराबाहेर काढल्यानंतर तासभरात न्यायालयाने दिला संरक्षणासह निवासाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 20:35 IST

मद्यपी पतीच्या मारहाणीनंतर घरातून हाकलून लावलेल्या पत्नीला न्यायालयात खटला दाखल होण्याच्या तासभरातच निवास मिळून देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशावरून अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली. धामणगाव रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असा अनुभव आला.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या इतिहासात प्रथमचपीडित महिलेचा पतीच्या घरात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मद्यपी पतीच्या मारहाणीनंतर घरातून हाकलून लावलेल्या पत्नीला न्यायालयात खटला दाखल होण्याच्या तासभरातच सरंक्षणासह निवास मिळून देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशावरून सरंक्षण अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली. धामणगाव रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असा अनुभवास आला.धामणगाव रेल्वे येथील रहिवासी महिला सारिका (३०) यांचा विवाह १३ आॅगस्ट २००५ रोजी गंगाधर मुलवंडे यांच्याशी झाला. पानठेला चालविणारे गंगाधरने लग्नानंतर दिडेक वर्षे पत्नीसोबत चांगला संसार केला. मात्र, त्यानंतर त्याला मद्याचे व्यसन जडले, तो पत्नीचा कौटुंबिक छळ करू लागला. पतीचा त्रास सहन करीत संसाराचा गाडा चालविणाऱ्या सारिकाला दोन मुली आहेत. मद्यधुंद अवस्थेत गंगाधर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. ती कसेबसे दिवस काढत होती. मात्र, ३० आॅगस्ट २०१८ रोजी रात्री २ वाजता गंगाधरने पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिने कशीबशी रात्र काढली, मात्र, सकाळीच बहीण प्रियंकाचे घर गाठून कौटुंबिक छळ सहन न झालेल्या सारिकाने धामणगावातील सरंक्षण अधिकारी कार्यालय गाठले. सरंक्षण अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार तत्काळ नोंदवून दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाठविली. सारिकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वैद्यकीय अधिकारी आशिष सालनकर यांनी वैद्यकीय अहवाल मिळवून सरंक्षण अधिकारी कुलदीप गावंडे यांनी प्रकरण न्यायालयात दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.ए.नहर यांनी प्रकरणाची तत्क्षण दखल घेऊन सरंक्षण (कलम १८) व निवासाचा आदेश (कलम १९ अन्वये) पारित केले. याची अमंलबजावणी करण्यासाठी सरंक्षण अधिकारी कुलदीप गावंडे, दत्तापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, पोलीस कर्मचारी मोनाली बोडके व मंगेश लकडे यांनी पीडिताला घरी प्रवेश मिळून दिला. याशिवाय पीडिताचा कौटुंबिक छळ करू नये आणि घराबाहेर हाकलू नये, असे पतीला बजावण्यात आले. विशेष म्हणजे न्यायालयात प्रकरण दाखल झाल्याच्या तासाभरात आदेशाची अंमलबजावणी करीत पीडित महिलेला न्याय मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे.कौटुंबिक हिंसाचार ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. पीडितांनी कुठल्याची प्रकारचा कौटुंबिक हिंसाचर सहन न करता, सरंक्षण अधिकाऱ्यांकडे दाद मागावी.- कुलदीप गावंडे,सरंक्षण अधिकारी, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Courtन्यायालय