शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला मतदान तर  १७ ऑक्टोबरला मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 16:56 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तीनही प्राधिकरणांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, रविवार १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

अमरावती, दि. 13- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तीनही प्राधिकरणांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, रविवार १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. अमरावती विभागांतर्गत अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यातील ६३ मतदान केंद्रांवर अधीसभा (सिनेट), विद्यापीठ परिषद व अभ्यास मंडळ या तीनही प्राधिकरणांची निवडणूक होणार आहे. २१ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणूक वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येतील. शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होऊन शक्यतोवर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यावर काही आक्षेप असल्यास २६ सप्टेंबर रोजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे त्याबाबत सुनावणी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर असून त्याचदिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी मतदान, तर १७ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

‘‘सिनेट निवडणूक मतदार यादीची संपूर्ण प्रक्रिया आटोपली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनात सिनेट निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाहीर वेळापत्रकानुसार निवडणुका घेतल्या जातील.- अजय देशमुख,निवडणूक निर्णय अधिकारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ