शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

बडनेरात पुन्हा झळकला नगरसेवकांच्या निषेधाचा फलक

By admin | Updated: October 5, 2016 00:18 IST

कंपासपुऱ्यातील हनुमान मंदिरासमोरून जाणाऱ्या मार्ग पेव्हिंग ब्लॉक उखडल्यामुळे वर्षभरास येथे भला मोठा खड्डा पडला आहे.

खड्डा बुजविणार केव्हा ? : आठवडाभरातील दुसरा प्रकार बडनेरा : कंपासपुऱ्यातील हनुमान मंदिरासमोरून जाणाऱ्या मार्ग पेव्हिंग ब्लॉक उखडल्यामुळे वर्षभरास येथे भला मोठा खड्डा पडला आहे. नागरिकांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिसरवासीयांनी या खड्ड्याच्या ठिकाणी नगरसेवकांच्या निषेधार्थ फलक लावून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. प्रभाग क्र. ४१ मधील कंपासपुऱ्यातील हनुमान मंदिराजवळच्या मैदानात दोन वर्षांपासून रखडलेल्या काँक्रीटीकरणाच्या विरोधात अंबाई नवरात्र महोत्सव समिती व कंपासपुऱ्यातील नागरिकांनी घट स्थापनेच्या दिवशी नगरसेवकांच्या नावे निषेध नोंदविणारे फलक लावले होते. तोच दोन दिवसानंतर येथून जवळच असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या मनस्तापाला कंटाळून दुसरे निषेधाचे फलक लावण्यात आले. दोन नगरसेवकांच्या आपसी मतभेदांनी प्रभागाचा विकास रखडला. शिवरात्री, हनुमान जयंती, गणपती, नवरात्र महोत्सवही संपलेत. आता विकास नवीन नगरसेवकच करणार का? अशा आशयाचे फलक लावण्यात आले. त्यात विनित म्हणून झोपलेल्या नगरसेवकांची जागृत जनता असेही लिहिेले आहे. ज्या मार्गावरचे काँक्रीटीकरण रखडले आहे. तसेच मोठा खड्डा निर्माण झाला आहे. तो मार्ग जुन्यवस्तीचा मुख्य मार्ग आहे. हा मार्ग महामार्गाला जोला आहे. यावरुन वाहतुकीची वर्दळ असते. मात्र या दोनही कामासंदर्भात या ठिकाणच्या नागरिकांनी आमदारांसह नगरसेवकांना वारंवार सुचविले आहे. शेवटी कंटाळून नागरिकांनी नगरसेवकांच्याच नावाने निषेधाचे फलक लावणे सुरू केले. आता आम्ही नगरसेवकांना कामासाठी तगादा लावणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. यापुढे कोणत्याही नगरसेवकाने नागरिकांच्या समस्या तत्काळ निकाली न लावल्यास निषेधांचे फलकच झळकवू, असेही बोलल्या जात आहे. (शहर प्रतिनिधी)बडनेऱ्यात रस्तेच पेव्हींग ब्लॉकचे पेव्हींग ब्लॉकचाच रस्ता तयार करण्याचा अफलातून प्रकार बडनेऱ्यात दृष्टीस पडत आहे. मंदिरासमोर रस्त्याच्या दुतर्फा बगीच्यामधील रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसविले आहे. बडनेरा शहरात रस्तेच पेव्हींग ब्लॉकने तयार करण्यात आले. हे यावरुन जड वाहतूक जात असते. एक पेवींग ब्लॉक सरकला की रस्ताच उखडतो, असेच काहीसे कंपासपुऱ्यात झाले. पेवींग ब्लॉक बसवू नये, अशी नागरिकांची मागणी असून सुद्धा या ठिकाणी पेवींग ब्लॉकचाच रस्ता बनविण्यात आलेला आहे. त्याचाच मनस्ताप नागरिकांना होतो आहे.