शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

कापूस उत्पादकांना गरज ५०६ कोटींच्या भरपाईची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:53 IST

जिल्ह्यात एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रामधील कपाशीचे बोंडअळीमुळे नुकसान झाले. यासाठी शासनाने ३० हजार ८०० रूपये प्रतीहेक्टरी मदत जाहीर केली.

ठळक मुद्देबोंडअळीचे नुकसान : कृषिमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी केव्हा?

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रामधील कपाशीचे बोंडअळीमुळे नुकसान झाले. यासाठी शासनाने ३० हजार ८०० रूपये प्रतीहेक्टरी मदत जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना किमान ५०६ कोटी ७४ लाख रुपयांच्या मदतीची आवश्कता आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे निधीची मागणी केली असल्यामुळे पीकविमा कंपन्या व बियाणे कंपण्यांची मदतीचे काय, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे.यंदा बीटी तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानेच शेतकऱ्यांवर संकट ओढावले. हजारो हेक्टरमधील कपाशीच्या उभ्या पिकात शेतकऱ्यांनी नांगर फिरविला. शेतकरी आक्रमक झाल्यानेच शासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे आदेश २३ डिसेंबरला दिलेत. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बोंडअळीने बाधित क्षेत्राला दोन हेक्टर मर्यादेत जिरायती कपाशीला हेक्टरी ३० हजार ८००, तर बागायती कपाशीला ३७ हजार ५०० रूपये हेक्टरप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. कपाशीच्या पंचनाम्याअंती जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रातील कपाशी बाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकाºयांनी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १८२ कोटी ६० लाखांच्या मदतीची मागणी शासनाकडे केली. मात्र, पीकविम्यासह बियाणे कंपण्यांकडून अपेक्षित भरपाईसाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये या मदतीविषयी संभ्रम आहे.‘एनडीआरएफ’चे १८२ कोटी मिळणारकेंद्राने एप्रिल २०१५ मध्ये ‘एनडीआरएफ’च्या निकषामध्ये बदल केले ते राज्यालाही बंधनकारक आहे. या निकषानुसार कीड व रोगामुळे शेतीपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्यास हेक्टरी ६,८०० रूपयांचीे मदत दिली जाते. पंचनाम्याअंती जिल्ह्यात १८२ कोटी ६० लाख मिळणार आहे. या विषयीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे.पीकविम्याचे १८ कोटींची भरपाई केव्हा?बोंडअळीच्या बाधित क्षेत्राला पीक विम्याची हेक्टरी ८ हजारांची भरपाई असे शासनाने जाहीर केले. यंदा २२ हजार ८४५ हेक्टर कपाशीचा विमा काढण्यात आला. त्यानुसार १८.२७ कोटींची भरपाई आवश्यक आहे. पीकविमा उंबरठा उत्पन्नावर जाहीर होतो. आता तालुका हा घटक गृहीत धरण्यात आल्याने त्यामुळे प्रत्येक ठिकाणची भरपाई सारखी कसी, असा शेतकºयांचा सवाल आहे.बियाणे कंपन्यांकडून हवेत १६८३ कोटीबीटी बियाणे तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानेच यंदा बोंडअळीचे संकट ओढावले. याविषयी हजारो तक्रारी झाल्यात. काही तक्रारी पोलीस ठाण्यातही झाल्यात. बियाणे कंपण्याकडून हेक्टरी १६ हजारांची मदत देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यास १६८२ कोटी ८३ लाखांची मदत अपेक्षित आहे. मात्र, याविषयी शासनस्तरावर कोणतीच हालचाल करण्यात आलेली नाही.