शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:30 IST

यंत्र सर्वच बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव : १८ हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र प्रभावित

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : यंत्र सर्वच बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील १८ हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक ८० ते ९० टक्के बुडाले आहे. परिणामी तालुक्यातील कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.चार ते पाच वर्षांपासून तालुक्यात सोयाबीन पीक शेतकऱ्यांना धोका देत असल्यामुळे तसेच मागील वर्षी कापसाला चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग सोयाबीनकडून कपाशीच्या पिकाकडे वळला. त्यात यावर्षी कापसाचे पीकही उत्तम आले. परंतु ऐन पीक हाती येण्याच्या वेळेतच घात झाला आणि गुलाबी बोंडअळीने कापसाच्या बोंडावर तुफानी हल्ला चढविला. कपाशीच्या झाडावरील फुटण्यास तयार असलेली ६० ते ७० पक्की बोंडे अक्षरश: खराब झालीत. त्यामुळे कपाशीचा दर्जा घसरून उत्पादनात खूप मोठी घट झाली.तालुक्यातील कापूस उत्पादकांच्या एकत्रित नुकसानीच्या ४५० कोटीच्या आकड्याला कृषी विभागाच्या अहवालाचा आधार आहे. जिल्हा कृषी विभागाच्या कृषी समितीने नोव्हेंबरमध्ये आपला अहवाल जाहीर केला आहे. त्या अहवालानुसार गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे एकरी १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तालुक्यातील कापूस पेऱ्याचा विचार करता व शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही लागले नसल्याचे चित्र आहे.आर्थिक स्थिती खालावलीयंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण गेला आहे. शेतकऱ्यांच्या हातून यंदा सुरुवातीच्या कमी पावसामुळे उडीद, मूग ही पिके हातून गेलीत. नंतर संत्रा फळगळीमुळे हेही पीक बुडाले. सोयाबीन पिकाने तर यावर्षी शेतकऱ्यांना अक्षरश: निराशा केली. त्यामुळे कधी नव्हे ती तालुक्यातील शेतकºयांची आर्थिक स्थिती यावर्षी खालावली आहे.शेतकºयांची परिस्थिती बिकट आहे. अशावेळी मदतीला शासन धावून आले पाहिले. अन्यथा शेतकरी आत्मघाती निर्णयापर्यंत पोहचू शकतात. तेव्हा शासनाने त्वरीत मदतीचा निर्णय घ्यावा.- बच्चू कडू,आमदार, अचलपूर