शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक म्हणतात... राजकारण गेले उडत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:00 IST

स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची आगामी निवडणूक पाहता पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नगरसेवकांना प्रत्येकी ८ लाख रुपये दिले खरे, मात्र पालकमंत्र्यांना मुळात तसे अधिकारच नसल्याचे स्पष्ट करीत स्थानिक आमदारांनी त्या निधी वितरणावर आक्षेप घेतला आहे.

ठळक मुद्दे८ लाख हवतेच : डीपीसीच्या निधीवर महापालिका तापली

आॅनलाईन लोकमतअमरावती : स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची आगामी निवडणूक पाहता पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नगरसेवकांना प्रत्येकी ८ लाख रुपये दिले खरे, मात्र पालकमंत्र्यांना मुळात तसे अधिकारच नसल्याचे स्पष्ट करीत स्थानिक आमदारांनी त्या निधी वितरणावर आक्षेप घेतला आहे. तथापि, त्या राजकारणाशी महापालिकेचा सुतराम संबंध नाही, त्यामुळे शहराचा विकास साधण्यासाठी महापालिका प्रशासनाने तो निधी विनाविलंब ‘रिलिज करावा, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. ‘तुमचे राजकारण गेले उडत, आम्हाला लोकांसमोर तोंड दाखवायला जागा नाही. ८ लाखांत किमान विकासकामे सुरू होऊ शकतील, असा मनोदय नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीसीचे पदसिध्द अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सर्व नगरसेवकांना प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचे घोषणा केली. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ७.३६ कोटी रुपयांचा निधी मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्याकडे वळता केला. डीपीसीतून निधी येणार असल्याने महापालिकेने नगरसेवकांकडून कामाची यादी मागविली. अंदाजपत्रक बनविले. इथपर्यंत सुरळीत सुरू असताना आ.सुनील देशमुख व आ.रवि राणा यांनी या निधीवर हक्क सांगितला. आणि निधी वितरणाचा मुहूर्त हुकला. २ महिन्यांनंतरही हा तिढा कायम आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये धुसफूस वाढली आहे. डीपीसीतील निधीवर आमचाही हक्क असल्याचे सांगत दोन्ही स्थानिक आमदारांनी या निधी वितरणात अडसर आणल्याचा आरोप महापालिकेत काँग्रेसी सदस्यांनी केला. त्याला आता भाजपमधील नगरसेवकांचेही पाठबळ मिळाले आहे. पालकमंत्री पोटे यांनी महापालिकेला दिलेल्या ७.३६ कोटींच्या निधीतून नगरसेवकांना पैसे केव्हा देता, अशी विचारणा विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांच्यासह सत्तापक्षाचे नेते सुनील काळे यांनी आयुक्तांना वारंवार केली आहे. मात्र, आयुक्तांकडे तूर्तास त्याचे सकारात्मक उत्तर नाही.या निधीतून प्रत्येकी आठ लाख रुपये येतील, असे मानून महापालिकेच्या बांधकाम विभागाने नगरसेवकांकडून कामाची यादी मागितली. अंदाजपत्रकही बनविले. मात्र, जिल्हाधिकारी स्तरावर दोन्ही आमदारांनी डीपीसीच्या निधीवर आक्षेप घेतल्याने निविदा प्रक्रिया सुरू झाली नाही. जिल्हा नियोजन समितीचे पालकत्व पालकमंत्र्यांकडे असले तरी आमदारसुद्धा डीपीसीचे सदस्य आहेत. त्यामुळे नगरसेवकांना प्रत्येकी ८ लाख रुपये देताना डीपीसीने आम्हालाही विश्वासात घेणे अगत्याचे होत, असे दोन्हे आमदारांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त मात्र पेचात अडकले आहेत. पालकमंत्री आणि दोन्ही आमदारांमध्ये आपले ‘भरित ’ होऊ नये, यासाठी या दोन्ही अधिकाºयांनी हा राजकीय गुंता सुटेपर्यत ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. या मुद्यावर सर्वपक्षीय नगरसेवक, आ.सुनील देशमुख व पालकमंत्री पोटे यांची भेट घेणार असून शहर विकासासाठी आपसी मतभेद बाजूला सारुन निधी वितरणावरील मळभ दूर करण्याची विनंती करतील.नगरसेवकांना निधीचा प्रतीक्षामार्च २०१७ मध्ये सत्तेत आल्यानंतर आणि नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही नगरसेवकाला अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. डीपीसीतून मिळत असलेल्या ८ लाखांमधून किमानपक्षी प्रभागात विकासकामांचा मुहूर्त साधला जाईल, अशी अपेक्षा सर्वपििक्षय नगरसेवकांना होती.मात्र तुर्तास तरी ती फलद्रुप झालेली नाही. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने सर्वांची नजर या ८ लाख रुपयांवर रोखली गेली आहे.राजकारणातील हेवेदावे दूर सारून हा निधी नगरसेवकांना विकासकामांसाठी विनाविलंब वितरित करावा, भाजपच्या सत्ताकाळात मागील ११ महिन्यात नगरसेवकांना षदामही मिळाला नाही. श्रेयाच्या राजकारणात शहराचे नुकसान होऊ नये.- बबलू शेखावत,विरोधी पक्ष नेता