वाद निकृष्ट रस्ते निर्मितीचा : अपहार झाला असेल तर कोणालाही सोडू नकाअमरावती : शहरात नगरोत्थान अंतर्गत रस्ते निर्मितीत अपहार झाल्याच्या आरोपावरुन महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक आ. सुनील देशमुखांविरुद्ध एकवटले. आमदार विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष आता अमरावतीवासियांना बघता येणार आहे. महापालिकेत मंगळवारी, सुटीच्या दिवशी स्थगित आमसभा घेण्यात आली. यात महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियातंर्गत शहरात सुरु असलेल्या रस्ते निर्मितीबाबत आमदारांनी नगरसेवकांवर घेतलेल्या आक्षेपासंदर्भात प्रस्ताव क्र. ८९ अन्वये सांगोपांग चर्चा करण्यात आली. ‘दूध का दूध, पानी का पानी’ असा शब्दप्रयोग करुन शिवसेनेचे प्रशांत वानखडे यांनी चर्चेला प्रारंभ केला. जनविकास काँग्रेसच्या सुजाता झाडे, बाळासाहेब भुयार तसेच अपक्ष दिनेश बूब, अंबादास जावरे तर राष्ट्रवादी फ्रंटचे मिलिंद बांबल, अविनाश मार्डीकर, चेतन पवार, निलिमा काळे, जावेद मेमन, सुनील काळे, काँग्रेसचे विलास इंगोले, बबलू शेखावत, योजना रेवस्कर, प्रदीप हिवसे, अमोल ठाकरे, अरुण जयस्वाल, धीरज हिवसे, रिपाइंचे प्रकाश बनसोड, प्रदीप दंदे, बसपाच्या निर्मला बोरकर, गुंफाबाई मेश्राम, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर, प्रदीप बाजड आदींनी चर्चेत सहभाग घेतला. रस्ते बांधकाम दोषपूर्ण केले असेल तर दोषींना कठोर शासन झाले पाहिजे, अशी भूमिका मांडताना रस्ते डांबरीकरण कंत्राटदारांना वठणीवर आणण्याची मागणी नगरसेवकांनी केली. अशातच आमदारांनी नगरसेवकांनी भ्रष्टाचार केल्याची टीका करणे संयुक्तिक नाही, असे प्रशांत वानखडे म्हणाले. सुजाता झाडे यांनी मान देवू नका; पण अपमान तर करु नका, असे वक्तव्य करून नगरसेवकांची समाजातील आदर्श प्रतीमा कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुनिल देशमुख म्हणतात, खरा सुत्रधार पुढे यावा नगरोत्थानच्या कामात गैरप्रकार झाला असल्यास अधिकारी, कंत्राटदारांवर फौजदारी दाखल व्हावी. पोलिसांच्या चौकशीत कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी ही कामे कोण्याचा सांगण्यावरुन करण्यात आली, हे पुढे आले तर त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, असा पुनरुच्चार ‘लोकमत’शी बोलताना केला. रस्ते निर्मितीची कामे दर्जाहिन करण्यास लावणारा खरा सुत्रधार मग तो मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवकसुद्धा असू शकतो, असे सूचक वक्तव्य देशमुख यांनी केले. राजकीय आरोप व सर्व्हिस यात अंतर नगरोत्थानच्या तीन कामांची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व्हिजीलंसने केली आहे. हा अंतिम निष्कर्ष नव्हे, असे स्पष्ट करून राजकीय आरोप आणि सर्व्हिस यात अंतर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तथा महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता जनार्धन भानुसे यांनी अहवाल वाचनादरम्यान सांगितले.दोषींवर कारवाई होईल- आयुक्तनगरोत्थानच्या पाच रस्त्यांची तपासणी करण्यात आली. काही कामांमध्ये थोड्याफार चुका आहेत. मात्र, त्या दुरुस्त करता येतात. वीज, पाणी पुरवठा व अभियंत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. काही रस्ते निर्मितीत थर कमी असताना त्याची नोंद इस्टिमेटनुसार दाखविण्यात आली आहे. ही अक्षम्य चूक आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असे चंद्रकांत गुडेवार यांनी स्पष्ट केले.
सुनील देशमुखांविरुद्ध नगरसेवक एकवटले
By admin | Updated: April 22, 2015 23:53 IST