शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : अमरावतीमध्ये आणखी दोन मृत महिला पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 23:25 IST

अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आठ झाली असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जणांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 अमरावती : येथील बफर झोनमध्ये नव्याने दोन वृद्ध महिलांना मृत्यूनंतर कोरोना असल्याचे निदान करण्यात आले. बुधवारी उशिरा रात्री अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या माहितीला दुजोरा दिला. दोघींपैकी एका ७० वर्षीय महिलेचा हैदरपु-यातील त्यांच्या राहत्या घरी मंगळवारी मृत्यू झाला होता. कमेला ग्राऊंड भागातील दुस-या ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूपश्चात दोन्ही महिलांच्या घशातील स्रावाचे नमुने  तपासणीसाठी विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.  बुधवारी उशिरा रात्री त्याचे अहवाल प्राप्त झाले. हैदरपु-यातील मृत महिला, यापूर्वी हैदरपु-यातच कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील असण्याची शक्यता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली.  या दोन्ही कोरोनाग्रस्त महिलांच्या संपर्कातील मनुष्यसाखळीचा महापालिकेचा आरोग्य विभाग शोध घेत असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आठ झाली असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जणांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिघांची प्रकृती सुधारण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावती