शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आदेशाची थट्टा; गर्दीच गर्दी, बडनेऱ्यात गुरांचा भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 20:37 IST

बडनेरा : गुरांचा बाजार बंद ठेवण्याबाबतचे आदेश असतानादेखील शुक्रवारचा बडनेरचा बाजार भारला. येथे परराज्यातून शेकडोंच्या संख्येत जनावरे विक्रीस येतात. ...

बडनेरा : गुरांचा बाजार बंद ठेवण्याबाबतचे आदेश असतानादेखील शुक्रवारचा बडनेरचा बाजार भारला. येथे परराज्यातून शेकडोंच्या संख्येत जनावरे विक्रीस येतात. कोरोना आजाराबाबत खरेच बाजार समिती संवेदनशील आहे का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अंतर्गत बडने-यात दर शुक्रवारी गुरांचा बाजार भरतो. सध्या कोरोनाचा संसर्ग पसरू  नये, यासाठी केंद्र राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. त्यात प्रामुख्याने गर्दीचे ठिकाण फोकसमध्ये आहे. गर्दी टाळा, असे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र बाजार समितीला याचा विसर पडला.

शुक्रवारी गुरांचा बाजार भरला. शेकडो जनावरे बाजारात पोहोचली. यात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्टÑ, राजस्थान, गुजरातहून जनावरे विक्रीसाठी आणल्याने खरेदी, विक्रीदारांची मोठी गर्दी होती. एकीकडे कोरोना आजारावर नियंत्रण मिळविण्याचे कार्य शासनस्तरावर सुरू असताना बडने-यात त्याला फाटा दिला जात आहे.

बाजाराच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा संसर्ग शिरल्यास त्याला बाजार समिती जबाबदार ठरेल, असे शहरवासीयांमध्ये बोलले जात आहे. जिल्ह्याधिकाºयांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे गुरांचे बाजार बंद ठेवण्यातबाबत आदेश निर्गमित झाले आहे.

गर्दीच्या प्रवाशांशी थेट संपर्क टाळा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीद्वारा कोरोना विषाणूपासून सावध राहा, गर्दीत प्रवाशांशी थेट संपर्क टाळा, अशा आवाहनाचे फलक बडने-यातील गुरांच्या बाजारात लावणयात आले आहे. त्यांनाच मात्र या फलकावरील संदेशाचा विसर पडल्याचे चित्र आहे.

खरेदी विक्रीदार मास्कविनाच बाजारात शेकडोंच्या संख्येत खरेदी विक्रीदार होते. मात्र, बोटावर मोजण्याइतकेच मास्क लावून होते. लहान मुलांची संख्यादेखील बरीच होती. 

मनपा प्रशासनाकडून ऐनवेळी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मिळाले. बाहेर राज्यातील गुरांची वाहने पोहोचल्या होत्या. पुढील शुक्रवारपासून पुढील आदेशपर्यंत बाजार बंद राहणार आहे. - किरण साबळे, निरीक्षक कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस