शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Amravati: चार दिवस, ४६१ किमी प्रवास; १४ आदिवासी मजुरांची उपाशीपोटी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 00:09 IST

हैदराबादमध्ये पोटाची खळगी भरायला गेलेल्या आदिवासी मजुरांचे हाल

अमरावती: कोरोनाच्या भीतीने सर्व देश लॉकडाऊन झाला. ज्या ठेकेदाराकडे कामाला होते,  त्यानेही हाकलून दिले. वाहनही उपलब्ध होऊ शकल्याने अखेर हैदराबादपासून तर  धामणगाव तालुक्यातील देवगावपर्यंत तीन दिवसांचा प्रवास आदिवासी तरुणांनी उपाशी पोटी केला.गावात रोजगार नसल्यामुळे मेळघाटातील अनेक आदिवासीचे लोंढे शहराकडे काही वर्षांत आले. हैदराबादमध्ये मेळघाटातील पाच आदिवासी तरुण मागील दोन वर्षांपासून काम करतात. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे या आदिवासी तरुणांना तिथून  हाकलून देण्यात आले. त्याचबरोबर नऊ आदिवासी तरुण वर्धा जिल्ह्यात मांडवा परिसरात समृद्धीच्या कामावर काम होते. तेथूनही त्यांना काढून टाकण्यात आले. अखेर कोरोनामुळे गड्या आपला गावच बरा म्हणून हे आदिवासी तरुण पायपीट करत निघाले.पोटात अन्न नसताना रात्र न दिवस पायपीट करत हे १४ आदिवासी मजूर धामणगाव तालुक्यातीलदेवगाव येथे पोहोचले. पेट्रोलिंग करताना तळेगाव दशासर येथील ठाणेदार रिता उईके यांना हे तरुण आढळले. त्यांनी चार दिवसांपासून उपाशी असलेल्या आदिवासी तरुणांना जेवण दिले. त्यानंतर धामणगावचे तहसीलदार भगवान कांबळे यांना कळवण्यात आले. त्यांनी तरुणांना रात्री त्यांच्या गाडीने धामणगाव येथे आणले. येथील माहेश्वरी हितकारक संघाचे अध्यक्ष मनीष मुंधडा यांनी त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.उद्या शनिवारी सकाळी अचलपूरपर्यंत या आदिवासी मजुरांना सोडण्यात येणार आहे. तर तेथून धारणी येथील तालुका प्रशासन त्यांच्या गावापर्यंत सोडणार आहे. मागील चार दिवसांपासून उपाशी असलेल्या आदिवासी मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था धामणगाव येथील  माहेश्वरी हितकारक संघ या सामाजिक संस्थेने केल्याने या सामाजिक संस्थेचे कौतुक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस