शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
4
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
5
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
6
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
8
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
9
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
10
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
11
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
12
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
13
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
14
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
15
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
16
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
17
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
18
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
19
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
20
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

यात्रांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST

अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील बहुतांश गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. आगामी काही ...

अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील बहुतांश गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. आगामी काही गावातील यात्रा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नगण्य असणारी कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवांवर मर्यादा आली आहे.

गतवर्षी यात्रा-जत्रांच्या हंगामात कडक लॉकडाऊनचा अनुभव नागरिकांनी घेतला. यंदा पुन्हा यात्रांच्या हंगामावर कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल थांबणार आहे. फेब्रुवारी ते मे दरम्यान ग्रामदैवताची यात्रा उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा होता. गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे यात्रा, निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम लग्नसोहळे, शाळा, महाविद्यालये बंद ठेवत या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. चालू वर्षाचे जानेवारी आणि फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाले होते. परंतु फेब्रुवारीच्या माध्यमातून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने या वर्षीदेखील यात्रा-जत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बॉक्स

भाविकांची वर्दळ नाही थांबणार

ग्रामीण भागातील यात्रा दरवर्षी आनंदाने आणि उत्साहात साजरी केली जाते.

यात्रासाठी बाहेरगावचे नातेवाईक येतात. या माध्यमातून आप्तस्वकीयांमध्ये आपुलकीची भावना वाढीस लागते. मात्र यंदाही वर्दळ अनुभवण्यास मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे.

बॉक्स

व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सूर

यात्रा-जत्रानिमित्त संबंधित ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे यात्रांचा हंगाम सर्वसामान्यांसाठी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरत असतो. मात्र, चालू वर्षीही या गावाचा आनंद नागरिकांना घेता येणार नसल्याचे सध्याचे स्थितीवरून दिसून येते. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजीचा सूर दिसून येत आहे.

बॉक्स

कोरोना सोडेना पाठ

गतवर्षीपासून नागरिक या संकटाला तोंड देत आहे. उपलब्ध होऊनही कोरोना पाठ सोडत नसल्याने अनेकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यातच वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्राबाबत कठोर निर्णय घ्यावे लागत आहे.