अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उपाययोजनांसाठी सोमवार, २२ फेब्रुवारीपासून ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले. मात्र, २२ ते २६ फेब्रुवारी या पाच दिवसांत कोरोनाचा आलेख वाढताच आहे. यात मृत्युसंख्येनेही भर घातली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने ‘लॉकडाऊन’मध्ये कठोर निर्बंध लादण्याची तयारी आरंभल्याची माहिती आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना विषाणू्च्या अनुषंगाने रविवार, २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत मंथन झाले. कोरोना गेला, अशा आविर्भावात नागरिक वावरत असल्याची खंत पालकमंत्र्यांनी या आढावा बैठकीत व्यक्त केली. कोरोनाबाबत कठोर उपाययोजना केल्या नाही तर, जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होईल, असे चित्र असल्यामुळे २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजतापासून अमरावती महापालिका आणि अचलपूर नगरपालिका क्षेत्रासाठी ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले. मात्र, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू, औषधी, उद्योगधंद्यांना सूट देण्यात आली आहे. परंतु, गत पाच दिवसांत नागरिक लॉकडाऊन असतानासुद्धा नियमांचे पालन करीत नसल्याचे वास्तव आहे. महापालिका, पोलीस, महसूल प्रशासनाकडून मास्कचा वापर नाही, शारीरिक अंतर नाही, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे अशा स्वरूपाची कार्यवाही करून दंडदेखील आकारले आहे. मात्र, नागरिक जेथे संधी मिळेल तेथे गर्दी केल्याशिवाय राहत नाही, असे लॉकडाऊनच्या काळातील चित्र अनुभवता आले.
----------------
१ मार्चपासून कठोर निर्बंधांसह पुन्हा ‘लॉकडाऊन’?
लॉकडाऊनच्या गत पाच दिवसांत ३३०७ संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोरोनाने २४ रुग्णांचा बळी घेतला आहे. संचारबंदी, लॉकडाऊन जाहीर असताना जनता अनावश्यक गर्दी करीत आहे. त्यामुळे आता विनाकारण गर्दी होणार नाही, कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी सोमवार, १ मार्चपासून कठोर निर्बंधांसह पुन्हा ‘लॉकडाऊन’ घोषित होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने तशी तयारी आरंभली आहे.
------------------------
असा वाढला ‘लॉकडाऊन’मध्ये कोरोना
२२ फेब्रुवारी- ६७३ ---- मृत्यू ०२
२३ फेब्रुवारी- ९२६----- मृत्यू ०६
२४ फेब्रुवारी- ८०२----- मृत्यू १०
२५ फेब्रुवारी- ९०६------ मृत्यू ०६
२६ फेब्रुवारी- ००००---- मृत्यू ०००