अमरावती : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६९२ झालेली आहे. याशिवाय बुधवारी ३४४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५०,७२२ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.
जिल्हाभरातील ३,४९९ नमुन्यांची बुधवारी तपासणी करण्यात आली. ३४४ नमुने पॉझिटिव्ह आढळले. यात ९.८३ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविली गेली. सलग चार दिवस पॉझिटिव्हिटीचा आलेख उंचावत असताना बुधवारी मात्र, माघारला आहे. जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित व्हावी, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी केला आहे. या आदेशानुसार रात्रीची संचारबंदी व दिवसाला जमावबंदी आहे. याशिवाय जीवनावश्यक व्यतिरिक्त अन्य दुकाने व आस्थापना बंद आहेत. तरीही रस्त्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ व वाहनांची गर्दी दिसून येते. प्रशासनाद्वारा दंडनीय कारवाया करीत नसल्याने कसा रोखणार कोरोना, असा नागरिकांचा सवाल आहे.
दरम्यान ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या रोज कमी होत असल्याने रुग्णालयातील बेडची संख्यादेखील कमी होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४० कोरोना हॉस्पिटल आहेत. यात एकूण बेडची संख्या २,८०६ आहेत व यामधील ८२० बेडवर सध्या रुग्ण असल्याने १,९८६ बेड रिक्त असल्याचा जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल आहे.
बॉक्स
बुधवारचे मृत्य
(कृपया तीन ओळी जागा सोडावी)