-------------
अल्पवयीन मुलीला पळविले ब्राह्मणवाडा थंडी : स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून १६ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार २९ डिसेंबर रोजी करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------
सावळी दातुरा येथे महिलेचा विनयभंग
परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी दातुरा येथे सासऱ्याने विनयभंग केल्याची तक्रार महिलेने २९ डिसेंबर रोजी दाखल केली. नथ्थूलाल जगराम प्रजापती (६४) असे आरोपीचे नाव आहे. सदर महिला मुलीसह वेगळी राहते. नथ्थूलाल मद्यपान करून तिच्याशी लोंबाझोंबी केल्याची तक्रार महिलेने केली. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३५४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
-----
अवैध रेती वाहतूकप्रकरणी गुन्हा
आसेगाव पूर्णा : नजीकच्या लसणापूर शिवारातून एमएच २७ एएल ८८२३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये रेती वाहून नेली जात होती. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही वाहन पिटाळण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी २९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला.
---------
क्षुल्लक कारणावरून लेहगावात चाकुहल्ला
लेहगाव : शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेहगाव येथे क्षुल्लक कारणावरून किशोर ज्ञानेश्वर सायतकर (३८) याने मंगेश रामकृष्ण कोरडे (३२) याच्यावर चाकुहल्ला केला. त्यामुळे त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी २९ डिसेंबर रोजी तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
---------------
उदखेड येथे महिलेला मारहाण
मोर्शी : तालुक्यातील उदखेड येथे मद्यपी पतीला शिवीगाळ करण्यास हटकले म्हणून पत्नी सुरेखा अनिल पोहरे (३४) यांना काठीने मारहाण करण्यात आली. मोर्शी पोलिसांनी अनिल आनंद पोहरे (४८) /ाच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला.
------------
दहिगाव धावडे शिवारातून कृषिसाहित्य लंपास
चांदूर रेल्वे : तालुक्यातील दहिगाव धावडे शिवारातील गजानन ओंकारराव खवले (रा. मालखेड) यांच्या शेतातून २६ डिसेंबर रोजी सहा स्प्रिंकलर पाईप, चार नोझल, एल्बो असा १० हजार ९०० रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले. गजानन खवले यांनी २९ डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दिली.
--------
पिंपळखुटा ते चिंचपूर मार्गावर अपघात
मंगरूळ दस्तगीर : पिंपळखुटा ते चिंचपूर रोडवर दुचाकी (एमएच २७ डी ८६३०) ला चारचाकीने धडक दिली. यात मुरलीधर नत्थूजी हारगो़डे (४५, रा. पिंपळखुटा) हे जबर जखमी झाले. २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हा अपघात झाला. मुरलीधर यांचे बंधू प्रमोद हारगोडे यांनी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
----------
दुचाकी घसरली
चालक दगावला
कुऱ्हा : दुचाकी रस्त्याने स्लिप झाल्याने अब्दुल मलिक अब्दुल खालिक (४०) यांचा मृत्यू झाला. एमएच २७ एई ९७६८ क्रमांकाच्या दुचाकीने ते भिवापूर येथून कुऱ्हा गावाकडे येत होते. १९ डिसेंबर रोजी रात्री १० नंतर हा अपघात घडला होता. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी मृताविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ अ अन्वये गुना नोंदविला.