अमरावती : जिल्ह्यात संक्रमितांचे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी पुन्हा सहा जणांचा बळी गेल्याने एकूण संख्या ५८४ झाली आहे. याशिवाय ४६१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४१,२८३ झालेली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी २,२६८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २०.३२ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आली. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३०७३ बेड आहेत. त्यापैकी २०१७ बेड शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यात कोरोना डेडिकेटेड हाॅस्पिटलमध्ये ९८४ व कोरोना केअर हॉस्पिटलमध्ये १,९३३ बेड शिल्लक आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या होम आयसोलेशनच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. या कक्षाद्वारे रुग्णांशी होणारा संवाद व कार्यपध्दतीबाबत त्यांनी माहिती घेतली. अनेक रुग्णांकडून गृह विलगीकरणाचे नियम काटेकोर पाळले जात आहेत. अशा रुग्णांच्या घराचे चित्रीकरण करून ते मिळाल्यास इतर संबंधितांनाही त्याप्रमाणे अंमलबजावणी करता येईल, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
बॉक्स
गुरुवारचे कोरोनामृत्यू
००००००००००००
०००००००००००००००००
(कृपया तीन ओळी सोडाव्या, माहिती यायची आहे.)