शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे सावट, यंदा होळी, धूलिवंदन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:14 IST

अमरावती : होळी, धूलिवंदन हा पारंपरिक सण आहे. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शैलेश ...

अमरावती : होळी, धूलिवंदन हा पारंपरिक सण आहे. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १६ मार्च रोजी काढलेल्या सुधारित आदेशानुसार सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. त्यामुळे यंदा होळी, धूलिवंदन सणावर विरजण पडणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर महसूल, महापालिकेचे कारवाईसाठी विशेष पथक नेमले जाणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने आदेश व निर्देश पारित करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग केल्यास कोणत्याही व्यक्तीविरूद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध असेल, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे होळी अथवा धूलिवंदनाच्यावेळी लोक एकत्र येतील आणि कोरोनाचा संसर्ग वाढेल, यामुळे होळी, धूलिवंदन सण सार्वत्रिक साजरा करता येणार नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केली आहे. सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, रिसोर्ट किंवा सार्वजनिक सभागृहांत धूलिवंदन साजरे करण्यास मनाई असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेशात नमूद केले आहे. गतवर्षी कोरडी होळी साजरी करण्याचे आदेश होते. मात्र, यंदा धूलिवंदनास ‘ना’ आहे.

--------------------

होळी, धूलिवंदन सार्वजनिक साजरी करता येणार नाही. समूहाने एकत्र गोळा होणे ही बाब आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणारी आहे. त्यामुळे कारवाईसाठी महापालिका, महसूल विभागाचे विशेष पथक नेमण्यात येणार आहे.

- नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी