शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणावर यंदा कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST

खांदेमळणी आणि पोळयाच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीला केवळ विश्रांतीच नव्हे, तर या दिवशी त्यांना शेतकरी पुरणपोळीसारखे गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला बैलाच्या शिंगांना रंग लावून, पाठीवर झूल पांघरून सजवले जाते. त्यांच्या नाकात नवीन वेसण आणि बांधण्यासाठी नवीन दोर खरेदी केले जातात.

ठळक मुद्देप्रशासनाच्या सूचना : सजावट साहित्यांनी बाजारपेठ सजली

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पोळा साजरा करण्याबाबत प्रशासनाने काही बंधने घातली आहेत. तरीही शहरातील विविध भागांत बैलांच्या सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. हे साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.खांदेमळणी आणि पोळयाच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीला केवळ विश्रांतीच नव्हे, तर या दिवशी त्यांना शेतकरी पुरणपोळीसारखे गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला बैलाच्या शिंगांना रंग लावून, पाठीवर झूल पांघरून सजवले जाते. त्यांच्या नाकात नवीन वेसण आणि बांधण्यासाठी नवीन दोर खरेदी केले जातात. या सर्व बैल सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणूचा संसर्ग ग्रामीण भागात सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाने पोळा सण सामूहिकरीत्या साजरा करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, यंदा पावसाने वेळोवेळी हजेरी लावल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पोळा सणाच्या निमित्ताने बैलांच्या सजावटीचे साहित्य घेण्यासाठी शेतकºयांमध्ये मोठा उत्साह आहे.दरवर्षी पोळ्याच्या पाच दिवस आधी शेतकरी बाजारपेठेतच साहित्य खरेदी करताना दिसतात. या बैलजोडीच्या गळ्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, घुंगरू, घुंगरपट्टा आदी वस्तूंचे विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. बैलजोडीसाठी फॅन्सी वस्तंूची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. बैलाच्या अंगावरीस झूल ७०० ते ९०० रुपयांपर्यंत विक्रीला आहे. बैलजोडीच्या सजावटीचे साहित्य यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. मंगळवारी मोठा, तर बुधवारी तान्हा पोळा आहे. मोठ्या पोळ्याप्रमाणेच तान्हा पोळ्याची उत्सुकता लहान मुलांमध्ये अधिक असते. यासाठी लाकडी बैलासह मातीचे लहान बैल मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीला आले आहेत.वरूडात पोळ्याचे तोरण तुटणार नाहीवरूड/ शेंदूरजनाघाट : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मानाचा पोळा सण भरविला जातो. मात्र, कोरोनामुळे शेकडो वर्षांच्या परंपरेला यंदा फाटा दिला जाणार आहे. यंदा शेतकरी पोळ्यात बैलजोडी नेणार नसून, घरीच पूजा करावी लागणार आहे. मानाचे तोरण तोडणाºयांनासुद्धा कोरोनाचा फटका बसणार आहे. पोळा सार्वजनिक स्वरूपात साजरा करू नये, यासाठी प्रशासनाने गावोगावी सूचना दिल्या आहेत. शेंदूरजनाघाटच्या पोळा बाजारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल व्हायची. तो पोळ्याच्या पूर्वसंध्येला भरणारा बाजार यंदा भरला नाही.

टॅग्स :Socialसामाजिक