अमरावती : एकेवेळी कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट सर्वत्र चर्चेत असलेल्या अमरावती जिल्हा आता कोरोनामुक्त होत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. रविवार ५ ते मंगळवार ७ सप्टेंबर या तीन दिवसाचे कालावधीत जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण आढळून आला नाही.विविध प्रयोगशाळांकडून एकाही रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आलेला नाही.तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या सलग तीन दिवसापासून शून्य आल्याचे नोंदविण्यात आली. परिणामी जिल्हा वासीयांना प्रामुख्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून जिल्ह्यात रुग्णसंख्या सतत वाढतच होती. मार्च, एप्रिलमध्ये दुसरी लाट असताना तर कोरोनाने कहरच केला. केवळ राज्यभरात जिल्ह्याचे नाव हॉटस्पॉट म्हणून ओळखले जायचे. जिल्ह्यातील कोरोनाची बिकट स्थिती पाहता केंद्रीय आरोग्य विभागाच्या टास्क फोर्सने सुपर स्पेशालिटी रूग्णालया बैठक घेऊन चिंता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी एक हजारावर रूग्ण आणि १० ते १२ मृत्यू असे जणू समीकरणच बनले होते.कोरोनाच्या या उद्रेकासमोर आरोग्य यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत होते.शाससकीय व खासगी कोविड रूग्णालयामध्ये ऑक्सिजन,बेडसची कमतरता सुध्दा जिल्ह्याने अनुभवली आहे. मात्र, हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत गेली. रविवार ५ सप्टेंबरपासून तर मंगळवार ७ सप्टेंबरपर्यंत कोरोनारुग्ण संख्या शून्य असल्याने ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरत आहे.
बॉक्स
खरबदारी आवश्यकच
कोरोना रूग्ण संख्या शून्यावर आली असली तरी यापूर्वीची कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता यापुढे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला तरी तो संपलेला नाही.सणासुदीचे दिवसांमध्ये मिळालेल्या शिथिलतेचा गैरफायदा न घेता आपल्यासोबतच इतराच्याही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.