शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कोरोना संसर्गात ५३८ पुरुषांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

 जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या मृत्यूबाबतची कारणमीमांसा वेळोवेळी करण्यात आली असता, यात ८० टक्क्यांवर नागरिकांना कॉमार्बिड आजार असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय उर्वरित मृत्यूमध्ये लक्षणे अंगावर काढणे घातक ठरले आहे. मंगळवारी दगावलेली चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील सहा महिन्यांची बालिका ही आतापर्यंतची सर्वांत कमी वयाची रुग्ण ठरली आहे. याशिवाय ९२ वर्षांचे अन्य एक ज्येष्ठ नागरिक  सर्वाधिक वयाचे रुग्ण ठरले आहेत.

ठळक मुद्दे‘डेथ ऑडिट’, जिल्ह्यात आतापर्यंत १८८ महिला दगावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ७२६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात ५३८ पुरुष व १८८ महिलांचा समावेश आहे. ५० वर्षांवरील रुग्णांवर कोरोनाची वक्रदृष्टी असल्याचे दिसून आले. बाधितांच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक ५८२ मृत्यू हे ५० वर्षांवरील नागरिकांचे आहे. यामध्येही पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव ‘डेथ ऑडिट’मध्ये स्पष्ट झाले. जिल्ह्यात ४ एप्रिलला झालेला पहिला कोरोनाग्रस्त हा ‘होमडेथ’ होता. तेव्हापासून कोरोना संसर्गात मृत्यूचे तांडव सुरू आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये १० मृत्यू झालेत. यात ८ केसेस या ‘होमडेथ’ होत्या. त्यानंतर जिल्ह्यात होमडेथ व्यक्तींचे स्वॅब घेणे बंद केले. त्याऐवजी त्या परिवारातील हायरिस्कमधील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर हा त्यावेळी सात ते आठ टक्के असा असल्याने अमरावती जिल्हा राज्यात सर्वाधिक मृत्युदराचा ठरला होता.  जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या मृत्यूबाबतची कारणमीमांसा वेळोवेळी करण्यात आली असता, यात ८० टक्क्यांवर नागरिकांना कॉमार्बिड आजार असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय उर्वरित मृत्यूमध्ये लक्षणे अंगावर काढणे घातक ठरले आहे. मंगळवारी दगावलेली चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील सहा महिन्यांची बालिका ही आतापर्यंतची सर्वांत कमी वयाची रुग्ण ठरली आहे. याशिवाय ९२ वर्षांचे अन्य एक ज्येष्ठ नागरिक  सर्वाधिक वयाचे रुग्ण ठरले आहेत. जिल्ह्यात ६० ते ७० वर्षांचे नागरिकांवरच कोरोनाची अधिक वक्रदृष्टी का, याबाबतचे गंभीरतेने विचार होऊन उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. 

१८९ महिलांचेही मृत्यूकोरोनाकाळात १८९ महिलांचे मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत. यामध्ये ५० ते ७० वयोगटातील अधिक रुग्ण आहेत.  जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार ५१ ते ६०  वयोगटातील ५६, तर ६१ ते ७० या वयोगटातील ५५ महिलांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंगावर दुखणे काढणे व  कॉर्माबिडी आजार व रोगप्रतिकार शक्ती घटणे ही प्रमुख कारणे आहेत.

६१ ते ७० वर्षे वयोगटात मृतांची संख्या अधिकजिल्ह्यात १३ एप्रिलपर्यंत कोरोना मृत्यूमध्ये ५० ते ६० वयोगटात आतापर्यंत १७५, तर ६१ ते ७० वयोगटात २०९ रुग्णांचा समावेश आहे. या व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी जास्त राहतात व बाहेरच्या व्यक्तींच्या जास्त संपर्कात राहत असल्याने त्यांना संसर्ग अधिक होतो. अंगावर लक्षणे काढणेदेखील महागडे ठरू शकते.

पुरुष कामानिमित्त बाहेर असताना, त्यांचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे पुरुषांची पॉझिटिव्हिटी अधिक आहे. याशिवाय अंगावर दुखणे काढणे, रोगप्रतिकार शक्तीत घट व कॉमार्बिड आजारांमुळे संसर्गात मृत्यूचे प्रमाण वाढते. - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

मार्च महिन्यात सर्वाधिक मृत्यूजिल्ह्यात यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा ब्लास्ट झाला. त्यावेळी महिनाभरात ७,७१३ पॉझिटिव्हची नोंद व १५४ मृत्यू झाले. मात्र, मार्च २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत १३,५१८ पॉझिटिव्हची नोंद व १६४ जणांचा बळी गेलेला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेनचा संसर्ग अधिक असल्याने जिल्ह्यात उद्रेक झाला होता. काही दिवस माघारत नाही तोच पुन्हा संसर्ग वाढायला लागला आहे.

रोगप्रतिकार शक्ती महत्त्वाचीकोरोना संक्रमित व्यक्तींमध्ये त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीचीही महत्त्वाचा भूमिका आहे. रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास संसर्गाचा गंभीर परिणाम होत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. यासाठी विविध उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रतिकार करण्याची क्षमता कमी असल्याने आजार अंगलट येतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू