शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोरोना, दुसऱ्या लाटेचा आलेख जिल्ह्यात माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला. जिल्हा किंबहुना राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावतीपासूनच झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व ४१० मृत्यू झालेले आहेत. याशिवाय मे महिन्याच्या २७ दिवसांत उच्चांकी २३,८३३ पॉझिटिव्ह व ४३८ मृत्यू झालेले आहेत.

ठळक मुद्देगुरुवारच्या चाचण्यांमध्ये ७.४७ टक्केच पाॅझिटिव्हिटीची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख आता माघारायला लागला आहे. गुरुवारच्या चाचणीत ७.४७ टक्केच पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला. जिल्हा किंबहुना राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावतीपासूनच झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व ४१० मृत्यू झालेले आहेत. याशिवाय मे महिन्याच्या २७ दिवसांत उच्चांकी २३,८३३ पॉझिटिव्ह व ४३८ मृत्यू झालेले आहेत. मात्र, या पाच दिवसांत पॉझिटिव्हीटीत कमी आल्याने रोज नव्या रुग्णांची नोंद कमी येत आहे.फेब्रुवारीत राज्यात जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढू लागल्याने येथील सात नमुने पुणे एनआयव्हीला तपासणीकरिता पाठविले असता, चार नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुन्हा चार रुग्ण प्रकारातील प्रत्येकी २५ नमुने तपासणीला पाठविले असता, रोनाचा डबल म्युटंट व्हेरिएंट आढळून आल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले होते. यात संक्रमणाचा दर अधिक असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्यावाढ झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीणमध्ये कोरोनाचा स्फोटजिल्हा ग्रामिणमध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये ७,१३४ पाॅझिटिव्ह व ६३३ मृत्यूची नोंद झाली व यंदा जानेवारी ते २६ मे पर्यंत ३९,६४६ पॉझिटिव्ह व ६३३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियम पाळले नसल्याने कुटुंबाचे कुटुंब पॉझिटिव्ह आलेले आहेत.  याशिवाय लक्षणे अंगावर काढणे, कोरोना चाचणींना उशीर त्याचप्रमाणे लगतच्या जिल्ह्याशी संपर्क यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

कोरोना, १७ मृत्यू, ४५५ पॉझिटिव्हअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी उपचारादरम्यान १५ संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्त मृतांची संख्या १,४१४ झालेली आहे. याशिवाय दोन अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचा मृतात समावेश आहे. जिल्ह्यात नव्या ४५५ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने संक्रमितांची एकूण संख्या ९०,५३० झालेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार गुरुवारी उपचारादरम्यान ८५ वर्षीय महिला, कारंजा घाडगे, ७० वर्षीय पुरुष, नांदगाव खंडेश्वर, ६६ वर्षीय पुरुष, कांडली, ७५ वर्षीय पुरुष, परतवाडा, ४४ वर्षीय पुरुष, कांडली, परतवाडा, ४६ वर्षीय महिला, रविनगर, अमरावती, ४१ वर्षीय पुरुष, शिंदी, अचलपूर, ५३ वर्षीय महिला, अचलपूर, ६० वर्षीय महिला, परतवाडा, ४९ वर्षीय महिला, नायगाव, ६५ वर्षीय पुरुष, वरूड, ४९ वर्षीय पुरुष, माळवेशपुरा, अचलपूर, ७० वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे, ७० वर्षीय पुरुष, अचलपूर व ४० वर्षीय महिला, सुकळी याशिवाय ४८ वर्षीय पुरुष, तळेगाव पंत, आष्टी, वर्धा, ७५ वर्षीय महिला, कोळंबी, मूर्तिजापूर, अकोला या रुग्णांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या