शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कोरोना इफेक्ट; अमरावती जिल्ह्यातील बहिरमची ऐतिहासिक यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 9:41 PM

Amravati News Bahirambaba विदर्भातील सुप्रसिद्ध तसेच सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहेत.

ठळक मुद्देप्लॉटचे लिलावही नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : विदर्भातील सुप्रसिद्ध तसेच सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहेत. त्यामुळे चांदूर बाजार पंचायत समितीमार्फत होणाऱ्या प्लॉटचे लिलावसुद्धा होणार नसल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रफुल भोरगडे यांनी दिली.हजारो कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या बहिरामबाबांच्या दर्शनाला दरवर्षी लाखो लोक येतात. या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. या यात्रेत सुरुवातीपासून शेतीपयोगी साहित्याची विक्री केली जाते. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी या यात्रेतील मुक्या जनावारांचा बळी देण्याची प्रथा बंद झाली. नंतर या यात्रेतील तमाशा फड बंद करण्यात आले. या यात्रेला शासकीय यात्रेचा दर्जा प्राप्त करून दिला गेला. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शासनाने ही ऐतिहासिक बहिरम यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.बहिरम यात्रेची सुरुवात दरवर्षी २० डिसेंबरपासून होते. त्या दृष्टीने यात्रेत लागणाऱ्या दुकानांच्या जागेचा लिलाव दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केला जातो. चांदूर बाजार पंचायत समितीला त्यातून दरवर्षी १० ते १२ लाखांचे उत्पन्नसुद्धा होते. परंतु, यात्रा रद्द झाल्याने या वर्षी स्थानिक पंचायत समितीला त्या उत्पन्नापासून मुकावे लागणार आहे.रोजगार, व्यवसायालाही फटकायात्रेतील दुकानांच्या माध्यमातून शेकडो गोरगरीब कुटुंबांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र, दरवर्षी होणारी कोट्यावधीची उलाढाल कोरोनामुळे थांबणार आहे. तेथे गर्दी होऊ न देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी आदेश काढले तसेच पंचायत समिती स्तरावर कडक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.दरवर्षीप्रमाणे मंदिरात २० डिसेंबर रोजी होमहवन व पूजन केले जाईल. मात्र, मंदिर परिसरात केवळ संस्थानचे अध्यक्ष व मर्यादित विश्वस्तांची उपस्थिती राहणार आहे तसेच भाविकांना मंदिरात प्रवेश न देता भैरवनाथाचे केवळ मुखदर्शन घेता येणार आहे.- किशोर ठाकरे, विश्वस्त, बहिरमबाबा संस्थान

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम