शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
3
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
4
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
5
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
6
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
7
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
8
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
9
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
10
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
11
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
12
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
13
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
14
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
15
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
16
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
17
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
18
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
19
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
20
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर

कोरोनाने राज्यातील भ्रष्टाचारही आणला नियंत्रणात; दोन महिन्यांत फक्त १३ ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:24 IST

कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारही थांबला

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी एप्रिल महिन्यात सात आणि मे महिन्यात १३ तारखेपर्यंत सहा ट्रॅप यशस्वी झाले आहेत.लॉकडाऊनमध्ये सर्व शासकीय कार्यालयांमध्ये फक्त पाच ते १० टक्केच कर्मचारी कर्तव्यावर येत आहेत. नागरिकांचा फारसा संपर्क अधिकाऱ्यांशी या दिवसांत आलेला नाही. नागरिक घरातच असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी आणि परिणामी शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारही थांबला आहे.गतवर्षी २०१९ मध्ये एप्रिल महिन्यांत ५८ ट्रॅपमध्ये शासकीय कार्यालयांशी संबंधित ७७ जण अडकले होते. मे महिन्यात ३५ सापळ्यांमध्ये ४५ जण अडकले होेते. लॉकडाऊनपूर्वी मार्च २०२० मध्ये ५८ ट्रॅपमध्ये ८६ जण अडकल्याची माहिती एसीबीच्या अहवालात नमूद आहे. मात्र, कोरोनाने गत दोन महिन्यांत अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाचखोरीची संधीच दिली नाही. वर्षभर कारवाईत व्यस्त राहणाऱ्या राज्यातील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांवरील ताणही यानिमित्त कमी झाला आहे.पाच महिन्यांत २११ सापळेराज्यातील विविध जिल्ह्यांतील विविध विभागांत एसीबीने केलेल्या कारवाईत पाच महिन्यांत २११ सापळे यशस्वी झाले असून, २९४ आरोपी निष्पन्न झाले. गत वर्षी पाच महिन्यांत ३२९ सापळ्यांमध्ये ४३५ जण अडकले होते. यंदा जानेवारी महिन्यांत ६८, फेब्रुवारीमध्ये ७२, मार्चमध्ये ५८, एप्रिलमध्ये सात आणि मे महिन्यांत सहा सापळे एसीबीने टाकले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस