लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/बडनेरा : अमरावती शहरातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम असून, शुक्रवारी सायंकाळी आणखी तीन कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १९ झाली आहे. वृत्त लिहिस्तोवर अमरावतीचा समावेश रेडझोनमध्ये अधिकृतरीत्या करण्यात आला नव्हता; तथापि कुठल्याही क्षणी ती घोषणा होऊ शकेल, अशी माहिती प्रशासनाने दिली.शनिवारचे तीन कोरोनाग्रस्त पुरुष असून, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान शनिवारी कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सदर ५२ वर्षीय इसम युसूफनगर या भागातील रहिवासी होता. उर्वरित दोघांपैकी ३३ वर्षीय इसम तारखेडा येथील असून, २३ तारखेला मृत्यू झालेल्या तारखेड येथील कोरोनाग्रस्त महिलेचा तो जवळचा नातेवाईक आहे. दुसरी ५३ वर्षीय व्यक्ती बडनेराच्या जुनीवस्ती नूरनगर भागातील रहिवासी आहे. ते परतवाड्याला २३ एप्रिल रोजी गेले होते. प्रकृती अस्वस्थामुळे २४ तारखेला अमरावतीला परतले. येथील एका खासगी डॉक्टरकडे त्यांनी तपासणी केली. त्यांना लगेच शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यांच्यावर आता अमरावतीच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या परतवाडा येथे मुक्कामी असलेल्या पाच आप्तेष्टांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. बडनेरा येथील नूरनगर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले.शहरातील ‘क्लस्टर हॉटस्पॉट’मध्ये २४ तासांत कोरोनाचे ११ रुग्ण आढळून आलेत. गुरुवारी रात्री उशिरा दोन, शुक्रवारी सायंकाळी चार, तर त्याच रात्री उशिरा दोन आणि शनिवारी तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाच्या प्रसाराची ही गती शहरवासीयांची चिंता वाढविणारी ठरली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरात संचारबंदी दोन तासांनी वाढविली. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेतच उघडी राहणार आहेत, तर भाजी बाजार हे ३ मेपर्यंत पूर्णत: बंद असतील.महापालिकेच्या आशा व एएनएम पथकांचे सर्वेक्षण या भागात सुरू आहे. नागपुरी गेट व खोलापुरी गेट पोलिसांनी शनिवारी रूट मार्च केला. १० चेक पोस्टद्वारे नागरिकांवर करडी नजर राखली जात आहे.मौलवींसोबत तीन बैठकीबफर झोनमध्ये कायद्याचे पालन व्हावे, नागरिकांनी आजारी व्यक्तींविषयी पथकाला माहिती द्यावी, आरोग्य तपासणी, थ्रोट स्वॅब तपासणी व्हावी, नागरिकांवर उपचार व्हावेत, यासाठी मौलवी व या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत तीन बैठकी आतापर्यंत झालेल्या आहेत. यामध्ये महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचेदेखील सहकार्य घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.‘क्लस्टर’वर ‘ड्रोन’ची नजरशहरातल्या क्लस्टर झोनमध्ये शनिवारपासून ड्रोन कॅमेºयाने नजर ठेवणे सुरू करण्यात आले. या भागात दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, चार पोलीस निरीक्षक यांचे पेट्रोलिंग आहे. आरसीपी व क्यूआरटी पथकेही मदतीला आहे.आतापर्यंत १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. शनिवारी तीन कोरोनाग्रस्त आढळले. बडनेºयातील कोरोनाग्रस्ताची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासत आहोत.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी
कोरोना @19
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST
शनिवारचे तीन कोरोनाग्रस्त पुरुष असून, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान शनिवारी कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सदर ५२ वर्षीय इसम युसूफनगर या भागातील रहिवासी होता. उर्वरित दोघांपैकी ३३ वर्षीय इसम तारखेडा येथील असून, २३ तारखेला मृत्यू झालेल्या तारखेड येथील कोरोनाग्रस्त महिलेचा तो जवळचा नातेवाईक आहे. दुसरी ५३ वर्षीय व्यक्ती बडनेराच्या जुनीवस्ती नूरनगर भागातील रहिवासी आहे.
कोरोना @19
ठळक मुद्देसंचारबंदी कडक, दोन तासाची वाढ। ‘क्लस्टर’मध्ये ३० तासात ११ पॉझिटिव्ह