शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

कोरोना; १६,००० क्रॉस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 05:00 IST

सप्टेंबर महिन्यात दरदिवशी दीड हजारांपर्यंत नमुने तपासणीला पाठविले जात असे. आता रविवारी १०० ते १५० व इतर दिवशी ५०० पर्यंत नमुन्यांची तपासणी अमरावती येथील विविध प्रयोगशाळांमध्ये होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत घट येत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय चाचण्यांमध्ये आता पॉझिटिव्हिटीचे प्रमाणदेखील १४ ते १८ टक्क्यांवर आहे. हेच प्रमाण सप्टेंबर महिन्यात ३५ ते ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते, हे येथे उल्लेखनीय.

ठळक मुद्देसोमवारी ६३ : सप्टेंबरमध्ये ७८७३, ऑक्टोबरमध्ये २२८९ संक्रमित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २०५ दिवसांत म्हणजेच २७ ऑक्टोबरला ६० रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १६,०४० वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान मंगळवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३६१ झाला आहे.जिल्ह्यात महापालिका क्षेत्रातील हाथीपुऱ्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत संक्रमणात सातत्याने वाढ झाली आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात संसर्गाला आळा बसला. सप्टेंबर महिन्यात तब्बल ७,८४३ म्हणजेच दररोज सरासरी २६२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. आता ऑक्टोबर महिन्याचे २७ दिवसांत २२८९ रुग्ण निष्पन्न झाले. म्हणजेच दररोज ८४.७७ संक्रमितांची नोंद झाली आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाला, हे म्हणणे इतक्यात धाडसाचे ठरेल.सप्टेंबर महिन्यात दरदिवशी दीड हजारांपर्यंत नमुने तपासणीला पाठविले जात असे. आता रविवारी १०० ते १५० व इतर दिवशी ५०० पर्यंत नमुन्यांची तपासणी अमरावती येथील विविध प्रयोगशाळांमध्ये होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत घट येत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय चाचण्यांमध्ये आता पॉझिटिव्हिटीचे प्रमाणदेखील १४ ते १८ टक्क्यांवर आहे. हेच प्रमाण सप्टेंबर महिन्यात ३५ ते ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते, हे येथे उल्लेखनीय.पुन्हा एकाचा बळी, एकूण ३६१जिल्ह्यात उपचारादरम्यान मंगळवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने संक्रमणने दगावलेल्यांची संख्या ३६१ झाली. सद्यस्थितीत मृत्यूचे प्रमाण हे २.१ टक्के असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात नमूद आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने मंगळवारी ९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यत १४, ८३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. संक्रमणमुक्तांचे प्रमाण उच्चांकी ९२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या