शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

कोरोना @ १३९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी शहरात नव्याने चार कंटेनमेंट झोन घोषित केले. यात वलगाव मार्गावरील मीठ कारखानच्या मागील बाजूस अलहिलाल कॉलनी, वलगाव मार्गावरील डी.एड. कॉलनी, हबीबनगर नंबर २ आणि रविनगरच्या मागील बाजूस असलेले वल्लभनगर यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देशहरालगतच्या क्षेत्रात शिरकाव : गुरूवारी नव्याने पाच संक्रमित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा गुरुवारी १३९ वर पोहोचला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. यात पाच महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.अमरावती शहरापासून ११ किमी अंतरावर असलेल्या वलगाव येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तेथील ३९ वर्षीय महिला पॉझिटिव्ह निघाली. जिल्ह्यातील ३९ व्या भागात कोरोनाने शिरकाव केल्याचे वलगाव येथे आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाने स्पष्ट झाले आहे. २१ मे रोजी सकाळी ११ वाजून ४१ मिनिटाला आलेल्या अहवालानुसार, लालखडी येथील २४ वर्षीय महिला, हनुमाननगर येथील ३८ वर्षीय महिला, हबीबनगर येथील ३२ वर्षीय पुरुष व अलहिलाल कॉलनी परिसरातील ५६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. या अहवालानुसार शहरात नव्याने अलहिलाल कॉलनी येथील क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले. याखेरीज वलगावचे क्षेत्र जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधित केले जाणार आहे.शहरात चार नवे कंटेनमेंट झोन घोषितकोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी शहरात नव्याने चार कंटेनमेंट झोन घोषित केले. यात वलगाव मार्गावरील मीठ कारखानच्या मागील बाजूस अलहिलाल कॉलनी, वलगाव मार्गावरील डी.एड. कॉलनी, हबीबनगर नंबर २ आणि रविनगरच्या मागील बाजूस असलेले वल्लभनगर यांचा समावेश आहे. या चारही झोनमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना अनावश्यक बाहेर जाता येणार नाही, असे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले. आतापर्यंत महानगरात २५ कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.मसानगंज हॉटस्पॉट सीलमसागंज परिसरात कोरोना संक्रमिताची संख्या वेगाने वाढत आहे. हा परिसर महापालिका प्रशासनाने हॉटस्पॉट म्हणून घोषित केला आहे. परिणामी मसानगंज भागात येणारे चहुबाजुचे रस्ते, मार्ग सील करण्यात आले आहेत. बाहेरील व्यक्त ी अथवा त्यांच्या वाहनांना प्रवेश मनाई आहे. या भागात आतापर्यंत २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या