शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

कोराना इफेक्ट; ट्रान्सस्क्रिप्टची मागणी मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 20:35 IST

२१ मार्च ते २४ जून या तीन महिन्यांत लॉकडाऊनमध्ये केवळ १० ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र पाठविले आहेत. त्यामुळे यंदा विदेशात उच्च शिक्षण आणि व्हिसा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी धावपळ दिसून येत नाही.

ठळक मुद्देविदेशात शिक्षणाला ना अमरावती विद्यापीठात लॉकडाऊनच्या काळात १० प्रमाणपत्र जारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदेशात शिक्षणासाठी अथवा व्हिसा मिळवायचा असल्यास ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून २१ मार्च ते २४ जून २०२० या लॉकडाऊनच्या काळात केवळ १० विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र घेतले आहेत. कोरोनामुळे या प्रमाणपत्राची मागणी मंदावली असून, विदेशात शिक्षण नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर आली आहे.अमरावती विद्यापीठातून सन २०१९ मध्ये ७६७ विद्यार्थ्यांनी ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र घेतल्याची नोंद आहे. हे प्रमाणपत्र विदेशातील नामांकित संस्था, विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असते. ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र थेट विद्यार्थ्यांच्या हाती दिले जात नाही. त्याकरिता विदेशातील कंपनी, संस्था यांचे ना-हरकत पत्र असल्यास विद्यापीठातून ते थेट त्यांच्याकडेच पाठविले जाते. जानेवारी ते २० मार्च २०२० यादरम्यान तीन महिन्यांत १७७ ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. परंतु, २१ मार्च ते २४ जून या तीन महिन्यांत लॉकडाऊनमध्ये केवळ १० ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र पाठविले आहेत. त्यामुळे यंदा विदेशात उच्च शिक्षण आणि व्हिसा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी धावपळ दिसून येत नाही. अमरावती विद्यापीठातून ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्रासाठी कॅनडा येथील वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेसकरिता सर्वाधिक मागणी राहते, असे आकडेवारीहून स्पष्ट होते.गतवर्षी वाटप झालेली संख्याअमरावती विद्यापीठातून सन २०१९ मध्ये ७६७ ट्रॉन्सस्किप्ट प्रमाणपत्र देण्यात आले. यात जानेवारीत ७५, फेब्रुवारीत ६९, मार्चमध्ये ६९, एप्रिलमध्ये ३१, मे मध्ये ६५, जूनमध्ये -५०, जुलैत ५६, ऑगस्टमध्ये ६२, सप्टेंबरमध्ये ६४, ऑक्टोबरमध्ये ५७, नोव्हेंबरमध्ये ६६, डिसेंबरमध्ये ९० प्रमाणपत्र विद्यापीठातून विदेशातील विविध कंपनी, शैक्षणिक संस्था, विद्यापीठांना पाठविले आहे.ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र हे विदेशात शैक्षणिक संस्था, व्हिसा, विद्यापीठ अथवा कंपनीच्या पत्रानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या नावे पाठविले जाते. हे प्रमाणपत्र अतिशय गोपनीय राहत असून, ते सीलबंद पाठविण्याची प्रक्रिया विद्यापीठ करते. हल्ली कोरोनामुळे या प्रमाणपत्रासाठी अर्ज नगण्य येत आहे. मागणी मंदावली आहे.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस