शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या धुऱ्यावर बैल चारण्यावरून वाद; शेतकरी महिलेची बलात्कारानंतर दगडाने ठेचून हत्या

By प्रदीप भाकरे | Updated: September 1, 2022 18:28 IST

मृताच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक

अमरावती : शेतीच्या धुऱ्यावर बैल चारण्यातून झालेल्या वादात एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. आरोपीची खुन्नस एवढ्यावर थांबली नाही. तर त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली. धारणी तालुक्यातील एका गावात बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही अश्लाघ्य घटना घडली. याप्रकरणी मृताच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून, धारणी पोलिसांनी खून व बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. सचिन उर्फ रम्मू शिवलाल दारसिंभे (२६) असे आरोपीचे नाव आहे.

तालुक्यातील एका गावात ५१ वर्षीय मृत महिलेची शेती आहे. तर आरोपी सचिनची देखील तेथे शेती आहे. नेहमीप्रमाणे ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ च्या आसपास ती महिला शेतात आली. तेथे शेतीच्या धुऱ्यावर बैल चारण्याच्या कारणावरून आरोपी सचीन व तिच्यात वाद झाला. झटापट झाली. त्यादरम्यान, सचिनने शेताच्या धुऱ्यावर तिच्यावर बलात्कार केला. तिने प्रचंड प्रतिकार केला. मात्र, तो प्रतिकार मोडून काढत त्याने तिची दगडाने ठेचून हत्या केली. तिचा खून केल्यानंतर आरोपीने तिला धुऱ्यावर निर्वस्त्र टाकून पळ काढला.सायंकाळी झाली घटना उघड

दुसरीकडे, सायंकाळचे सात वाजल्यानंतर पत्नी घरी न आल्याने तिच्या पतीने शेत गाठले. त्यावेळी परिसरातील शेतकरी मनोज जाधव याने आरोपी सचिन येथून पळत गेल्याची माहिती त्याला दिली. शेताच्या धुऱ्यावर पोहोचताच त्याला पत्नी निर्वस्त्र व मृतावस्थेत आढळली. पत्नीचे कलेवर बघताच त्याच्या पायाखालील वाळू सरकली. तो लगेच गावाकडे धावला. त्याबाबत पोलीस पाटलाला कळविले.

आयपीएस गौर पोहोचले

घटनेची माहिती मिळताच आयपीएस गौहर हसन व धारणीचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, पोलीस उपनिरिक्षक रीना सदार घटनास्थळी पोहचले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिचा मृतदेह रात्री उशिरा धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणला. आरोपीचा रात्रीच शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबियांच्या सुपुर्द करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती