शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

वारसदारांच्या लाँचिंगसाठी जोडण्या सुरू

By admin | Updated: January 13, 2017 00:02 IST

जिल्हा परिषदेचे रणांगण : अध्यक्षपद खुले असल्याने वाढली चुरस; अटीतटीच्या लढती पाहावयास मिळणार

तीन वर्षांत विकास : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३५५ गावे व याअंतर्गत एक लाख ६० हजार २०७ हेक्टर खारपाणपट्ट्याच्या विकासाचे शासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. याक्षेत्राच्या उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प येत्या सहा महिन्यांत सुरू केला जाईल. तो तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. याप्रकल्पांतर्गत १५ अवर्षणग्रस्त जिल्हे व खारपाणपट्ट्याचा शाश्वत विकास करण्यात येणार आहे. मागीस १५ वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्याच्या कृषीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभे ठाकली आहेत. लहरी हवामानामुळे शेतीक्षेत्रात होणारे बदल व इतर विविध समस्यांमुळे कृषी उत्पादकता कमी होत चालली आहे. यासाठी हा कृषी संजीवनी प्रकल्प शासनाद्वारा राबविण्यात येणार आहे. हा एकात्मिक स्वरूपाचा प्रकल्प असून समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे होणार आहे. प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करणारनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन व कृषीमूल्य साखळीचे बळकटीकरण करणे, शेती उत्पादक कंपन्यांची निर्मिती, भाडेतत्वावर कृषी अवजारे केंद्र सुविधा निर्मिती, उत्पादक कंपन्यांना शेतमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी, विक्री आदींबाबत सहाय्य करणे, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, सीडहबसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, स्थानिक परिस्थितीनुसार व पिकनिहाय कृषी हवामान सल्ला, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आदींचा समावेश राहणार आहे. हवामान बदलामुळे शेतीवरील संभाव्य दूरगामी परिणामहवामानातील बदलामुळे पीक उत्पादकतेवर विशेषत: कोरडवाहू पिकांवर मोठा परिणाम होतो. अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकासाठी पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होतो. त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील कर्बामध्ये घट होऊन उत्पादकता कमी होते, वाढत्या तापमानामुळे जमिनीच्या ओलाव्यात घट येते.