शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कागदावरच, कसे रोखणार कोरोनाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोरोनाग्रस्तांची संख्या १५ हजारांच्या दारात आहे. दररोज रुग्णसंख्येचा स्फोट होत असताना, रुग्णांकडून त्याच्या संपर्कातील ...

अमरावती : जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोरोनाग्रस्तांची संख्या १५ हजारांच्या दारात आहे. दररोज रुग्णसंख्येचा स्फोट होत असताना, रुग्णांकडून त्याच्या संपर्कातील किंवा हायरिस्क व्यक्तींची चौकशी करण्याचा व त्यांच्या नमुना तपासणीचा आरोग्य यंत्रणेला विसर पडला आहे. एकंदर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कागदावरच असल्याने कोरोनाला कसे रोखणार, असा नागरिकांचा सवाल आहे.

यासंदर्भात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या आप्तस्वकीयांशी संवाद साधला असला तरी आरोग्य यंत्रणेचा कोणताही कर्मचारी फिरकलाच नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे सॅनिटेशन व कंटेनमेंट झोन फार दूरची गोष्ट राहिली आहे. कुठेही सर्वेक्षण नाही. आशा, एएनएमची पथके नाहीत. कुठल्याच कायार्लयात पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंग होत नाही. मास्क हनुवटीवर आले आहे. सगळीकडे फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. यामध्ये फक्त नागरिकांना दोष देऊन आरोग्य यंत्रणा नामनिराळी होत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. किमान २० संपर्क शोधा, असे आदेश आहेत. याशिवाय राज्याच्या आरोग्य संचालकांनी जिल्ह्याला रोज चार हजार चाचण्यांचे टार्गेट दिले आहे. चाचण्यांची सद्यस्थिती पाहता, एका रुग्णामागे दोन ते तीन चाचण्या होत असताना जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण १० असल्याचे सांगत आरोग्य विभाग स्वत:चा बचाव करीत असली तरी दररोज जाहीर होणारे कोरोनाग्रस्तांचे आकडे आरोग्य यंत्रणेची पोलखोल करीत असल्याचे वास्तव आहे.

मुळात आरोग्य यंत्रणेत समन्वयाचा अभाव आहे. सुरुवातीच्या काळात रुग्णाला त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली जायची व आशांचे पथक त्या व्यक्तींच्या घरी जाऊन चाचणी करण्याच्या सूचना द्यायच्या. मात्र, आता या सर्व बाबींचा विसर आरोग्य यंत्रणेला पडला असल्यानेच कोरोनाचा संसर्ग कसा रोखणार, हा यक्षप्रश्न आहे.

बॉक्स

केस १ : गंध व चव गेल्यामुळे राजापेठ परिसरातील एका व्यक्तीने महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी घरातील सर्व व्यक्तींची चाचणी केली. दोन दिवसानंतर महापालिकेच्या यंत्रणेकडून पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला. याशिवाय रुग्णाच्या हाय-रिस्क व लो-रिस्कमध्ये कोण आहेत, याची कुठलीच चौकशी करण्यात आली नाही.

केस २ : भातकुली तालुक्यातील पती-पत्नी आजारी असल्याने अमरावतीला आले व डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघांवरही उपचार सुरू झाले. महिलेला तब्बल तीन दिवसांनी फोन आला. मात्र, त्यामध्ये संपर्कातील व्यक्तींची कुठलीच चौकशी करण्यात आलेली नाही व त्या व्यक्तीला तर डिस्चार्ज मिळेपर्यंतही फोन आलेला नाही.

केस ३: एका कंपनीत कार्यरत व्यक्ती दस्तुरनगर परिसरात राहते. बरे नसल्याने त्यांनी सुपर स्पेशालिटीच्या स्वॅब सेंटरमध्ये चाचणी केली. तीन दिवस कुठलीच माहिती न मिळाल्याने त्यांनी वैयक्तिक स्तरावर चौकशी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्यांनी होम आयसोलेशनची सुविधा घेतली व त्यानंतर दुसऱ्या दिवशी महापालिकेचा फोन आला. यामध्ये त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची कुठलीच माहिती विचारणा झाली नाही.

बॉक्स (कोट ऐवजी)

लक्षणे नसलेले रुग्ण अधिक धोकादायक

जिल्ह्यात ८० टक्के रुग्णांना कोरोनाची कुठलीच लक्षणे रहित रॅन्डमली सर्व्हेमध्ये पहिले दोन टक्के तर आता पाच ते सहा टक्के नागरिक पॉझिटिव्ह नोंद होत आहे. (निवडणूक व एका संस्थेद्वारा कोरोना चाचणी कॅम्प) योगायोगाने चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आले. नाहीतर हे कोरोना बॉम्ब जिल्हाभरात फिरत राहिले असते व कित्येक जणांना त्यांच्यापासून कोरोनाचा संसर्ग झाला असता. त्यामुळे कॉन्टक्ट टेसिंग व चाचण्या वाढविणे आज कोरोनाचे वाढत्या संसगार्त जिल्ह्याची गरज आहे.

पाईंटर

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती

कोरोनाचे एकूण रुग्ण : ०००००

बरे झालेले रुग्ण : ०००००

उपचार सुरू असलेले रुग्ण : ००००

कोरोना बळी : ००००००