शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कन्सल्टंटचा महापालिकेत स्वैर वावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:41 IST

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दोन कोटी रुपयांच्या वाहन खरेदीसाठी राबविलेली निविदाप्रक्रिया संदीप देशमुख या तथाकथित कन्सल्टंटने ‘मॅनेज’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेतील प्रत्येक विभागात त्यांचा स्वैर वावर आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्याचाही वरदहस्त : गोपनीयतेला सुरुंग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दोन कोटी रुपयांच्या वाहन खरेदीसाठी राबविलेली निविदाप्रक्रिया संदीप देशमुख या तथाकथित कन्सल्टंटने ‘मॅनेज’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेतील प्रत्येक विभागात त्यांचा स्वैर वावर आहे.महापालिकेच्या विविध फायली हाताळत असताना संदीप देशमुख यांना कुणीही अटकाव घालत नाही. यावरून संदीप देशमुखांची अधिकाºयांच्या लेखी असलेली ‘अर्थपूर्ण’ उपयोगिता लक्षात घेण्याजोगी आहे. देशमुख हे महापालिकेत निविदाप्रक्रिया करण्याचे काम उत्कृष्टरीत्या बजावतात, हे वास्तव जगजाहीर आहे. मात्र त्यांना तसा अधिकार आहे का, हे मात्र अनुत्तरित आहे. महापालिकेत ‘प्रोजेक्ट को-आॅर्डिनेटर’ वजा प्रकल्प सल्लागार म्हणून आयुक्तांनी आपली आॅर्डर काढली आहे, असे ते सांगतात. हे एकवेळ सत्य मानल्यास ते महापालिकेच्या प्रत्येक विभागात जाऊन तेथील फाइल, संगणक हाताळू शकतात काय, सिंगल कॉन्ट्रक्टच्या निविदा प्रपत्रातील अटी-शर्तींमध्ये बदल करू शकतात काय, याचे उत्तर देशमुख यांच्यासह महापालिका प्रशासनाला द्यावे लागणार आहे.आयुक्त हेमंत पवार यांच्यासह उपायुक्तद्वय नरेंद्र वानखडे व महेश देशमुख, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, भांडार अधीक्षक मंगेश जाधव, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्यासह अनेक विभागांत संदीप देशमुख फाइल घेऊन फिरत असतात. ते कुठल्या पदावर आहेत, हे कुणीही अधिकृत सांगायला तयार नाही. मात्र, निविदाप्रक्रिया असल्यास प्रत्येकाला त्यांची गरज भासते. या अनधिकृत व्यक्तीवर प्रशासनाचाही अंकुश नाही. खासगी व्यक्तीची महापालिकेतील घुसखोरी आयुक्तांनी थांबवावी, अशी अपेक्षा आहे.कार्यकारी अभियंत्याच्या दालनात बस्तानसंदीप देशमुख हे कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांच्या दालनात नेहमीच असतात. अगदी बिनधास्तपणे ते पोतदार यांच्या खुर्चीला खुर्ची लावून त्यांचे संगणक हाताळतात. पोतदार यांच्या कार्यालयातील कंत्राटी कर्मचारीही त्यांचे संगणक देशमुख यांना विनासायास उपलब्ध करून देतात.