शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तलाव सौंदर्यीकरणातून रस्ता बांधकामाचा घाट!

By admin | Updated: November 4, 2015 00:34 IST

शहरातील सागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भंडारा नगर पालिकेने २.२५ कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यता दिली असली तरी ...

प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव : तत्कालीन नगराध्यक्षांनी दिली तांत्रिक मान्यताभंडारा : शहरातील सागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भंडारा नगर पालिकेने २.२५ कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यता दिली असली तरी या कामातून त्या परिसरात असलेल्या ले-आऊटमध्ये जाण्यासाठी रस्ता बनविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. सध्या ही फाईल जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी असून स्थानिक आमदाराने या कामाविषयी नगरविकास मंत्रालयात तक्रार केलेली आहे.शहरातील तलाव सौंदर्यीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याच धर्तीवर सागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी तत्कालीन नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांच्या काळात पालिकेने २.२५ कोटी रुपयांचा निधीला तांत्रिक मान्यता दिली. या निधीतून तलावाचे सौंदर्यीकरण झाले तर शहराच्या सौंदर्यात भर पडू शकते. परंतु सागर तलावाच्या पाळीवरुन रस्ता बनविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाली आहे. काजीनगर गेटमधून पूढे जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु त्यापलिकडे चार ते पाच एकर परिसरात ले-आऊट पाडण्यात आलेले आहे. परंतु रस्ता नसल्यामुळे त्या ले-आऊटला मागणी नाही. त्यामुळे सागर तलाव सौंदर्यीकरणाच्या नावावर निधी मिळविण्यात आला आहे. हा रस्ता सार्वजनिक वापरासाठी राहणार नसून केवळ ले-आऊट धारकांसाठी करण्याचा मनसुबा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)