चंद्रशेखर बावनकुळे : नांदगावपेठला २२० केव्ही उपकेंद्रअमरावती : पाच जिल्ह्यांकरिता असलेल्या महावितरणाच्या अकोला येथील परिमंडळाचे विभाजन करुन अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील वीजग्राहकांना तत्पर व गतिमान सेवा देण्याकरिता अमरावती परिमंडळाची निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. येथील विद्युत भवन येथे नवनिर्मित अमरावती परिमंडळ कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. ग्राहकसंख्या व भौगोलिक रचनेच्या आधारावर नविन कार्यालयांची रचना यापुढे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रविण पोटे, आ.सुनिल देशमुख, आ.रमेश बुंदिले, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, माजी खासदार अनंत गुढे, तुषार भारतीय, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय ताकसांडे तसेच अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी उपस्थित होते. अमरावती परिमंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते करण्यात आले.ना.बावनकुळे पुढे म्हणाले की, वीजवाहन्या व शरीरातील रक्तवाहिन्या यांचे कार्य जवळपास सारखे व अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी यंत्रणा व ग्राहक सवेमध्ये सुधारणा आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असून अमरावती जिल्ह्यातील विजेची विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. लवकरच नांदगाव पेठ येथे २२० के.व्ही.उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असून धारणी येथे सुद्धा १३२ के.व्ही.उपकेंद्राचे काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गतिमान सेवेसाठी अमरावती परिमंडळाची निर्मिती
By admin | Updated: October 4, 2015 01:00 IST