शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रलोभन देऊन मिळविली संमती; बालविवाहानंतर जबरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:01 IST

पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अल्पवयीन मुलीच्या पालकांना पैशाचे प्रलोभन देऊन तिच्याशी लग्न केल्यानंतर तिचा लैंगिक छळ करण्यात आला. चार ते पाच महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी २८ मे रोजी रात्री १२.२३ वाजता एका महिलेच्या तक्रारीवरून चार पुरुष व दोन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), (एन), ३२३, ५०६, ३४, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल केला.  तक्रारीनुसार,  एका अल्पवयीन मुलीवर हा प्रसंग उद्भवला.  तक्रारकर्ता महिलेच्या एका नातेवाईकास फोन करून मला तुमच्या नातेवाईक मुलीशी लग्न करायचे आहे, असे आरोपी अमोल सोळंके (३५, ता. भातकुली) याने कळविले. मात्र, त्या लग्नाला अल्पवयीन मुलीने नकार दिला. त्यावेळी पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

मारहाणीमुळे परतली तर म्हणाला जीव देतोदारू पिऊन अमोलने त्या अल्पवयीन मुलीला मारहाण केली. कुठल्याही कारणावरून होत असलेल्या मारहाणीमुळे ती माहेरी परतली. त्यावर त्याने मोबाईल कॉल करून तू घरी परत ये, अन्यथा तेथे येऊन स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अखेर तिने २८ मे रोजी वलगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अमोल सोळंके (३५), अंबादास सोळंके (५७), गजानन चंपत पवार (४०), विजय चंपत पवार व एक महिला (सर्व रा. ता. भातकुली) यांच्यासह अकोला जिल्ह्यातील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीचाही समावेश आहे.

काय म्हणतो कायदा'बालविवाह प्रतिबंध कायदा' हा महत्त्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. या कायद्याप्रमाणे १८ वर्षांहून लहान मुलगी व २१ वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाहीत. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. ज्या बालक वा बालिकेचा विवाह झाला आहे; त्यांना तो मान्य नसल्यास न्यायालयात अर्ज करून रद्दबादल ठरवता येतो. बालवधूला पतीकडून किंवा तो अज्ञान असल्यास सासऱ्याकडून पोटगी मिळू शकते.

 

टॅग्स :marriageलग्न