शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

चणा खरेदीच्या मागणीसाठी काँग्रेसची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:04 IST

शासकीय चणा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी ८ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्यावतीने अल्टिमेटम् दिला होता. त्यानंतरही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे सोमवार, ११ मार्च रोजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.

ठळक मुद्देनिवेदन : शुक्रवारपासून खरेदी; प्रशासनाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासकीय चणा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी ८ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्यावतीने अल्टिमेटम् दिला होता. त्यानंतरही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे सोमवार, ११ मार्च रोजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.राज्य शासनाकडे वेळोवेळी मागणी केल्यानंतरही जिल्ह्यात अद्यापही शासकीय हरभरा खरेदीची नोंदणी व खरेदीबाबत कार्यवाही केलेली नव्हती. परिणामी व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रूपये फरकाने सर्रास शेतकºयांची लूट होत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. तातडीने हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे आ. वीरेंद्र जगताप यांनी रेटून धरली. तुरीचे चुकारे, बोंडअळी अनुदान, समृद्धी महामार्गातील शेतकºयांच्या तक्रारीवर कारवाई, चांदूर रेल्वे तालुका व शहरातील पाणीटंचाई, बियाणे कंपन्यांकडून बोगस बियाणे पुरवठ्यामुळे इतर अनेक तालुक्यांतील १८५ कोटींच्या नुकसानाची भरपाई आदी मुद्यांवर जिल्हाधिकाºयांसोबतच चर्चा केली. यासोबतच नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील मातंंग समाजाच्या घरकुल मुद्यावरही चर्चा करू न न्याय देण्याची मागणी केली. हरभरा खरेदीची प्रक्रिया शुक्रवार १५ मार्च पासूनसुरू करण्याचे आश्वासन सहकार विभागाचे अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आंदोलन निवळले. यावेळी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, केवलराम, काळे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे, मोहन सिंगवी, सदस्या वासंती मंगरोळे, बाळासाहेब हिंगणीकर, अनिता मेश्राम, हरिभाऊ मोहोड, सुरेश निमकर, नितीन दगडकर, गणेश आरेकर, नगराध्य सिटू सूर्यवंशी, प्रदीप वाघ, राजेंद्र गोरले, महेंद्र गैलवार, दयाराम काळे, पंकज मोरे, गजानन राठोड, राहुल येवले, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, प्रमोद दाळू, नीलेश घोडेराव, शिवाजी बंड, संजय वानखडे, प्रकाश काळबांडे, अभिजित देवके, बापूराव गायकवाड, हरिभाऊ गवर्इं, अमोल होले, परिक्षित जगताप,बबलू बोबडे, बच्चू बोबडे, श्रीधर काळे, प्रदीप देशमुख, वीरेंद्रसिंह जाधव, संजय सरोदे शेखर औघड आदी पदाधिकारी उपस्थित होते.