१० पंचायत समित्यांची निवडणूक : भाजप, अपक्षांना प्रत्येकी दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला एक सभापतीपदअमरावती: जिल्हा परिषदेत प्रमुख पक्ष म्हणून समोर आल्यानंतर काँग्रेसने पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीतही बाजी मारली आहे. अमरावती, नांदगाव खंडेश्वर, वरुड व चिखलदरा येथे काँग्रेसचे सभापती निवडून आले. मोर्शी व अंजनगाव सुर्जीत भाजप, चांदूर बाजार व दर्यापुरात अपक्ष तर भातकुलीत सेना, अचलपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत प्रहार व युवा स्वाभिमानला फटका बसला आहे.
काँग्रेसने राखला गड; चार सभापती, तीन उपसभापती
By admin | Updated: March 15, 2017 00:05 IST