पालकमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक : चार निरीक्षकांची नियुक्ती
अमरावती : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार, १६ डिसेंबर राेजी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पालकमंत्री यशोमती ठाकूर व यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील चारही नगरपंचायतींत काँग्रेसचीच सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. याकरिता चार निरीक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी कामाला लागण्याचे निर्देश यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले. या बैठकीला माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा निरीक्षक रवींद्र दरेकर यांच्यासह पक्षाचे निरिक्षक सुनिल कोल्हे व धनंजय देशमुख यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली नगर पंचायतीचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका संपताच नगरपंचायतीच्या निवडणुका लागण्याचे संकेत आहे. निवडणुकीची पुर्वतयारी व नियोजन करण्याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटीने ही बैठक बोलविली होती. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी पदाधिकाऱ्यांना मागदर्शन करून चारही नगरपंचायतींवर काँग्रेसचाच झेंडा फडकविण्याबाबचे निर्देश दिले, याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सत्ता प्राप्त करण्यातकरिता केलेल्या नियोजनाचे सादरीकरण करीत चारही नगरपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी जिल्हा काँग्रेस सज्ज असल्याचे सांगितले. शिवाय स्थानिक पदाधिकाऱ्यांनादेखील नियोजन करण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष नरेंद्र ठाकूर, मुकद्दर पठाण, अतुल देशमुख, मुकुंद देशमुख, अमोल धवसे, तसेच संजय लायदे, निशिकांत जाधव, परिक्षित जगताप, पंकज मोरे, सिद्धार्थ बोबडे उपस्थित होते.
बॉक्स
असे आहेत निरीक्षक
काँग्रेस पक्षाने नगरपंचायतीकरिता निरीक्षक नियुक्त केले आहेत. यात धारणी व नांदगाव खंडेश्र्वर नगरपंचायतीसाठी सुनील कोल्हे, धनंजय देशमुख यांच्याकडे तिवसा व भातकुली या दोन नगरपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक पदाधिकाऱ्यांना एका नगरपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी तिवसा येथे २७ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. नांदगाव खंडेश्र्वर येथे गिरीश कराळे यांच्या उपस्थितीत बैठक २८ डिसेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता होईल. बाळासाहेब हिंगणीकर यांच्या उपस्थितीत २ जानेवारी दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. तर भातकुली तालुक्याची जबाबदारी गणेश आरेकर यांच्याकडे देण्यात आली असून ते ४ जानेवारी दुपारी २ वाजता बैठक घेणार आहे.