धामणगाव रेल्वे : जि़प़निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चारही जागेवर विजय मिळवित वर्चस्व कायम ठेवले आहे़ आ़वीेरेंद्र जगताप यांचा या तालुक्यात दबदबा कायम आहेत़आज सकाळी तहसील कार्यालयात सुरू झालेल्या मतमोजणीत जुना धामणगाव जि़प़सर्कलमध्ये काँग्रेसच्या वैशाली विजय बोरकर यांनी १ हजार ७९ मते घेत विजय मिळविला़ भाजपच्या उमेदवार पूनम सहारे यांना ५ हजार २९३ मतांवर समाधन मानावे लागले़ तर बोरकर,यांना ६ हजार ३४२ मते मिळाली तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या ज्योती कैलास औगड १ हजार ५४४, भाकप च्या पपीता मनोहरे ७१७, भारीप च्या सुलोचना पाटील ४२, बसपाच्या अर्चना काळबांडे २९७, अपक्ष मंदा हिवराळे यांना १३५ मते मिळाली़ मंगरूळ दस्तगीर जि़प़सर्कल मध्ये काँग्रेस चे सुरेश निमकर २ हजार ५७३ अधीक मते घेवून विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली़ भाजपाचे मंगेश मारोडकर यांना ३ हजार ७५० मते मिळाली तर निमकर यांना ६ हजार ३२३ मते प्राप्त झाली़ प्रहार चे प्रफुल डाफ ३ हजार १३८ , शिवसेनेचे मनोज कडू १८६, बसपाचे सुधीर निस्ताने ९५८, रॉक़ा़ चे मनोज शिवणकर ३१८, अपक्ष राजीव गायकवाड ३४० असे मते मिळालीत़ देवगाव जि़प़सर्कल मध्ये अटीतटीची लढत पहायला मिळाली. काँग्रेसच्या प्रियंका दगडकर ५५ मते घेवून विजय मिळविला़ दगडकर यांना ५ हजार १४६ तर भाजपाच्या साधना धांदे यांना ५ हजार ९१ मते प्राप्त झाली़ शिवसेनेच्या संगीता दाभाडे १ हजार ६०८, राकाँच्या नंदा शेेंडे ७८२, बसपच्या सुनीता मलवार १ हजार ६४८ यांना मते मिळालीत़ तळेगाव दशासर जि़प़सर्कल मध्ये काँग्रेस च्या अनिता राजू मेश्राम ४९१ मते मिळविली. त्यांना ६ हजार ६५८ मते मिळालीत प्रतिस्पर्धी भाजपाच्या कांता नागसेन मेश्राम यांना ६ हजार १६७ मते प्राप्त झालीत़ अपक्ष उमेदवार सुनिता विरूळकर ५५५, करू णा ढोणे १५७, आशा इंगोले ५९५ यांना मते मिळालीत़
धामणगावात काँग्रेसचाच वरचष्मा $$्रिजिल्हा परिषद निवडणूक : आ़ वीरेंद्र जगताप यांचा दबदबा कायम
By admin | Updated: February 24, 2017 00:20 IST