शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रसचा दणका, खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:41 IST

जिल्ह्यात मूग, उडीद व सोयाबीनची सर्वच केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी व खरेदी सुरू करण्यासह अन्य मागण्यांसाठी आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या दालनात सोमवारी दुपारी १ वाजतापासून ठिय्या दिला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या : सर्व केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीनच्या आॅनलाईन नोंदणीलाही सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात मूग, उडीद व सोयाबीनची सर्वच केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी व खरेदी सुरू करण्यासह अन्य मागण्यांसाठी आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या दालनात सोमवारी दुपारी १ वाजतापासून ठिय्या दिला. अखेर शासनाने नमते घेत सर्व केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी व चार केंद्रांवर मूग व उडदाची खरेदी सोमवारपासून सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. यामुळे दसरा -दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अपुºया पावसाने खरीप उद्ध्वस्त झाल्यावरही शासनाने जाचक अटींचा निकष लावीत सहा तालुक्यांना दुष्काळाची कळ लागू केली. कर्जवाटपही बँकांनी नाममात्र केल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकºयांना खासगी सावकारांजवळून कर्ज घ्यावे लागत आहे. या सर्व मुद्यांवर शुक्रवारी जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सोमवारपर्यंत केंद्रावर खरेदी सुरू न झाल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.जिल्ह्यातील काँंग्रेससह युवक काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या आवारात एकवटले व दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, बबलू देशमुखांसह जिल्हा ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या दिला. युवक काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी दालनातच बैठक मांडली. यावेळी शासन निषेधाच्या व शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या.जिल्ह्यतील सात केंद्रांना विनाकारण ब्लॅकलिस्ट करून शेतकऱ्यांची अडवणूक केल्यानेच शेतकऱ्यांची खेडा खरेदीत लूट होत असल्याचा आरोप यावेळी आमदारद्वयींनी केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सातत्याने शासन व प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढल्याने सोमवारपासून सर्व केंद्रांवर आॅनलाईन खरेदी व दर्यापूर, मोर्शी, धामणगाव रेल्वे व अचलपूर या चार केंद्रावर मूग व उडदाची खरेदी सुरू करीत असल्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी आमदार केवलराम काळे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, महेंद्रसिंग गैलवार, प्रकाश साबळे, हरिभाऊ मोहोड, भागवत खांडे, संजय मार्डीकर, प्रमोद दाळू, अभिजित देवके, वैभव वानखडे, बिट्टू मंगरोळे, दयाराम काळे, बंडू देशमुख, नितीन दगडकर, सुरेश निमकर, वासंती मंगरोळे, पंकज मोरे, परिक्षित जगताप, राहुल येवले, श्रीराम नेहर, बापूराव, रितेश पांडव, गायकवाड, बबलू बोबडे, बच्चू बोबडे, मुकदर खॉ पठाण, दिलीप काळबांडे, रमेश काळे, मुकुंद देशमुख, वीरेंद्र जाधव, सुनील जुनघरे, शिल्पा महल्ले, ज्योती ठाकरे आदी उपस्थित होते.सर्वच केंद्रांवर होणार नोंदणी व खरेदीगतवर्षी आॅनलाइन व आॅफलाइन खरेदीच्या घोळात जिल्ह्यातील सात खरेदी विक्री संस्थांना ब्लॅकलिस्टेड केले होते. मात्र, काही केंद्रांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याची बाब आ. वीरेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकाºयांचे यापूर्वीच निदर्शनात आणून दिल्याने काही संस्थांना काळ्या यादीतून वगळण्यात येऊन अटी, शर्तीच्या अधिन मंजुरी मिळाली आहे. या सर्व केंद्रांवर आता आॅनलाइन नोंदणी व खरेदीचे होणार आहेत.धामणगावात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार होत आहे. शेतकºयांजवळून कमी भावात खरेदी करायचे अन् नाफेडला अधिक भावात विकायचा, हा गोरखधंदा सुरू आहे. आठ दिवसांत सोयाबीनची खरेदी सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू.- वीरेंद्र जगताप,आमदार, चांदूर रेल्वेसर्व केंद्रांवर सोमवारपासूनच नोंदणी व चार केंद्रावर मूग, उडदाची खरेदीचे लेखी आश्वासन मिळाले. सोयाबीन खरेदीसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. सहा तालुक्यांत नव्हे, तर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे.- यशोमती ठाकूर,आमदार, तिवसासर्वच केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाले. सोयाबीन खरेदीचे आदेश नाहीत, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. आम्ही पुढच्या सोमवारपर्यंतची मुदत प्रशासनाला दिली आहे. त्यानंतर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू.- बबलू देशमुख,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी