शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बिगरशेती परवान्याबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: July 17, 2014 23:50 IST

विकास आराखडा मंजूर करण्यात आलेल्या महापालिका व नगरपरिषदेत बिगरशेती परवान्याची शासनाने प्रक्रिया सुलभ केली आहे. मात्र हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असून शासन निर्णयात यासंदर्भात

अमरावती : विकास आराखडा मंजूर करण्यात आलेल्या महापालिका व नगरपरिषदेत बिगरशेती परवान्याची शासनाने प्रक्रिया सुलभ केली आहे. मात्र हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असून शासन निर्णयात यासंदर्भात कोणत्या बाबी समाविष्ट करण्यात येतील, याबाबत बांधकाम व्यावसायिक, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. बिगरशेती परवान्याची प्रक्रिया सुलभ केली असली तरी विकास आराखड्यावरच त्याचे भवितव्य अवलंबून राहील. महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात बांधकामासाठी बिगरशेती परवाना नियमांना शासनाने मुक्त केले.महापालिका बनविणार डेटा बँकया नियमांमुळे स्वमालकीच्या जमिनीवर विकास करणे सहज सुलभ करण्यात आले आहे. भोगवटदार वर्ग-१ च्या जमीनमालकाला विकास करायचा असल्यास महापालिकेतून सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल. त्याकरिता महापालिकेला शहर विकास आराखडयातील नमूद बाबीनुसार ‘डेटा बँक’ तयार करावी लागणार आहे. बिगरशेती जमिनीचे प्रकरण आल्यास आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन ते प्रकरण ‘डेटा बँक’ मध्ये पाठविण्याची प्रक्रिया करावी लागेल. पूर्वी अनेक महिने बिगरशेतीची प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित राहायची. मात्र नवीन नियमानुसार, ही प्रक्रिया अधिक सुलभ करुन एकखिडकी योजनेनुसार राबविली जाणार आहे. महापालिकेत शहर विकास आराखड्यानुसार तांत्रिक बाबी पूर्ण करुन या प्रकरणांना मंजुरी द्यावी लागणार आहे. बिगरशेती परवान्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेल्या मंजुरीची भानगड थांबविण्यात आली आहे. मात्र आताही ९ विभागांची कागदपत्रे जोडावे लागणार आहे. पूर्वी वेगवेगळया विभागाची परवानगी आवश्यक होती. परंतु ही कटकट थांबल्याने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.