लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : माकडांच्या टोळीतील दोन भड्यांच्या (माकडाच्या) संघर्षात शहरातील ब्राम्हणसभा निवासी त्रस्त झाले आहेत. महिन्याभरापासून या भड्यांचा संघर्ष चालू असून, ब्राम्हणसभा निवासी त्यात भरडले जात आहेत. ११ जुलैला तर या भड्याने ५० वर्षीय महिलेला गंभीर जखमी केले. टोंगळ्याची वाटी सरकण्यापासून तर दोन ठिकाणी त्या महिलेचा पाय फ्रॅक्चर झाले आहे. शहरातील खासगी दवाखान्यात त्या महिलेवर उपचार सुरू आहेत.यापूर्वी ४८ वर्षीय पुरुषाच्या पोटरीचा लचका या माकडाने घेतला. यात तो गंभीर जखमी झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह अमरावतीला त्यावर औषधोपचार केले गेलेत. याच माकडांनी अचलपूर नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापतींच्या घरावरही दहशत पसरविली होती. त्यांची आई व बहिणीचा रक्तदाब त्या माकडाने वाढविला होता. आईने तर स्वत:ला बाथरूममध्ये बंदिस्त करून घेतले होते. गुरुवारच्या उपवासाचे भाजलेले शेंगदाणे या माकडाने घरात घुसून खाल्ले होते.दरम्यान, या दोन भड्यांतील एका भड्याला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने पकडले होते. वनविभागाच्या कस्टडीत असताना ते माकड तेथून वनअधिकाऱ्यांना चकमा देत पळाले. कस्टडीतून पळालेले ते माकड परत ब्राम्हणसभेत व लगतच्या परिसरात मोठ्या दिमाखात ‘मै आ गया’ च्या भूमिकेत अवतरले. लगतच्या एका खासगी दवाखाना परिसरातील अनेकांना त्याने चावा घेतला. रस्त्याने चालत्या माणसाला ढकलले. महिलांची खोडही काढली. या माकडांनी ब्राम्हणसभेत चांगलाच धुमाकूळ घातला असल्याने त्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.वनकर्मचाऱ्याला चकमा११ जुलैला परत त्या माकडाने ब्राम्हणसभावासीयांची झोप उडवली. महिलेचा पायही मोडला. यादरम्यान १३ जुलैला परत या भड्याने (माकडाने) ब्राम्हणसभेत गोंधळ घातला. एका घरात घुसून शेंगदाण्याचा डब्बा पळविला, तर सायंकाळच्या दरम्यान एकाच्या बेडरूमसमोरच त्या भड्याने ठिय्या मांडला. नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापती महिलेच्या घरावर बैठक मारली. वनविभागाचे कर्मचारी सुरमा भोपालीला घेऊन घटनास्थळी आले. भोपालीने त्याला पकडण्याकरिता आकोडाही फेकला. मात्र, भड्या वनकर्मचाऱ्यांसह त्या सुरमा भोपालीला चकमा देत तेथून पसार झाला. भड्यांची दहशत ब्राम्हणसभेत कायम आहे.
दोन माकडात संघर्ष; महिलेच्या पायाला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:01 IST
यापूर्वी ४८ वर्षीय पुरुषाच्या पोटरीचा लचका या माकडाने घेतला. यात तो गंभीर जखमी झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह अमरावतीला त्यावर औषधोपचार केले गेलेत. याच माकडांनी अचलपूर नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापतींच्या घरावरही दहशत पसरविली होती. त्यांची आई व बहिणीचा रक्तदाब त्या माकडाने वाढविला होता. आईने तर स्वत:ला बाथरूममध्ये बंदिस्त करून घेतले होते.
दोन माकडात संघर्ष; महिलेच्या पायाला चावा
ठळक मुद्देपरतवाडा येथील घटना : महिलेचा पाय फ्रॅक्चर, माजी शिक्षण सभापतींच्या घरावरही ठिय्या