शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांची यादी प्रमाणित करण्याची अट शिथिल

By admin | Updated: May 31, 2014 23:09 IST

संरक्षित वनक्षेत्राच्या गावातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना गॅस व दुभत्या जनावरांसाठी अनुदान तसेच वृक्ष लागवड संरक्षणासाठी देण्यात येणार्‍या योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.

अमरावती : संरक्षित वनक्षेत्राच्या गावातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना गॅस व दुभत्या जनावरांसाठी अनुदान तसेच वृक्ष लागवड संरक्षणासाठी देण्यात येणार्‍या योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या योजनेचा लाभ केवळ अनुसूचित जातीलाच व्हावा यासाठी लाभार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असल्यास योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे. यापूर्वी लाभार्थ्याची यादी समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडून प्रमाणित करण्यात येत होती. त्यामुळे अनुदान मिळण्यास विलंब लागत होता. ही अट शिथिल करण्यात आल्याने योजनेचा लाभ त्वरीत मिळणार आहे. राज्यात वनक्षेत्रालगतच्या गावांची संख्या १५,५00 इतकी आहे. यासाठी १२,६00 संयुक्त वन समित्या स्थापन केलेल्या आहेत. राज्यात ६१,९३९ किलोमीटर वनक्षेत्र असून २0१२-१३ व २0१३-१४ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती उपाययोजनेंतर्गत लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधी वाटपासाठी काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार अनुसूचित जातीचे लाभार्थी निश्‍चित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडून यादी प्रमाणित करण्यात येत होती. यादी प्रमाणीकरणास विलंब लागत असल्याने योजनेची अंमलबजावणीही विलंबाने होत होती. त्यामुळे ही अट शिथिल करून थेट जात प्रमाणपत्रासह समाजकल्याण अधिकार्‍यांकडे पाठवून मंजुरी घेतली जाणार आहे. ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र आहेत त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. जात प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांना सहायक आयुक्तांकडून प्रमाणित करून घेतल्यानंतरच योजनेचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)