लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा/अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण घुशींनी पोखरल्याचे विभागाच्या कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाºयाने स्पष्ट केले. अद्याप दुरुस्ती झाली नसल्याने भ्रष्टाचाराचा प्रश्नच नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.तिवसा तालुक्यात मोझरी ते शेंदूरजना बाजारला जाणाºया मुख्य कालव्यावरील ४५/२९३ या पुलाखालील अस्तरीकरणाला मोठे भगदाड पडल्याने पुलास धोका आहे. अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटले व झुडुपे उगविली आहेत. त्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने जनदरबारात मांडले. उपविभागीय अभियंता लंगडे यांनी वृत्ताची दखल घेऊन घटनास्थळ पाहणी केली व अधिनस्थ यंत्रणेला बजावले. कार्यकारी अभियंता पोटफोडे यांना दिलेल्या अहवालात अस्तरीकरण घुशींचा कारनामा नमूद केला. कार्यकारी अभियंत्यांनीदेखील सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण घुशींनी पोखरल्याचे पत्र ‘लोकमत’ कार्यालयास पाठविले. त्यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.नवे संकट कधीही...अनेक भगदाडे यापूर्वी चक्क मुरुमांनी बुजवून अस्तरीकरणासोबतच या विभागाची अब्रू झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रपंच आगामी काळात मुख्य कालव्याची भगदाडे उघडी पाडून पुन्हा नव्या संकटाला जन्म देणारा ठरू शकतो.अस्तरीकरणाला भगदाड असल्याचे मान्यमुळात अस्तरीकरणाच्या कामात झालेला भ्रष्टाचारच या भगदाडांनी अधोरेखित केला आहे. अशीच स्थिती राहिल्यास सिंचन सुविधेसाठी निर्मित कालवे शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचविण्याऐवजी त्यांच्या विपन्नावस्थेस कारणीभूत ठरणार असल्याचे वास्तव आहे.कामांचा दर्जा सुमार!सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असणाºया मुख्य कालव्याचे सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण जर उंदीर, घुशी पोखरत असतील, तर त्या कामाचा दर्जा सुमार आहे, हेच स्पष्ट होते. या विभागाच्या अखत्यारीत झालेल्या कोट्यावधींच्या कामांचा दर्जा किती सुमार होता, हे आता भगदाडांनी स्पष्ट केले आहे.
मुख्य कालव्यांचे काँक्रीट अस्तरीकरण घुशींनी पोखरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:09 IST
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण घुशींनी पोखरल्याचे विभागाच्या कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाºयाने स्पष्ट केले.
मुख्य कालव्यांचे काँक्रीट अस्तरीकरण घुशींनी पोखरले
ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांचा अजब तर्क : ठिकठिकाणी भगदाड, बोगस कामे उघड