वॅगन दुरूस्ती कारखान्याला सुरू होण्यासाठी अजूनही एक वर्षांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाच बंगला परिसरातून कारखान्याकडे जावे लागते. अवजड वाहनांमुळे आधीच्या रस्त्याची पार वाट लागली आहे. परिसरातील नागरिकांना अवजड वाहनांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अडीच वर्षांपासून पाच बंगला परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या खराब रस्त्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यावर त्याची दखल घेऊन चार महिन्यांपूर्वी रस्ता निर्मितीचे भूमिपूजन करण्यात आले. डांबरीकरणापूर्वीचे काम सध्या सुरू आहे.
वॅगन कारखान्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ सुरूच आहे. पुढेही सुरूच राहणार आहे. हे लक्षात घेता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचाच झाला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी अवघ्या एक किलोमीटरचा हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होईल यावर भर द्यावा, असे बोलल्या जात आहे. भविष्यात या मार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याच मार्गाने खेड्यांवरील शेकडो लोक बडनेरा, अमरावती शहरात दैनंदिन कामकाजासाठी येत असतात.
"""""""""”""
कोट
रेल्वे वॅगन कारखान्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. यापुढेही होणार आहे डांबरीकरणाचा रस्ता टिकणार नाही. तेव्हा सिमेंट काँक्रीटचा रस्ताच तयार करणे योग्य ठरेल.
- सिद्धार्थ बनसोड, सामाजिक कार्यकर्ते